साईबाबांच्या दरबारात प्रामाणिकपणाची सेवा; ४५ हजारांचे पेंडल केले परत

साईबाबांच्या दरबारात प्रामाणिकपणाची सेवा; ४५ हजारांचे पेंडल केले परत


साईबाबांच्या दरबारात प्रामाणिकपणाची सेवा; ४५ हजारांचे पेंडल केले परत
शिर्डी । विनोद जवरे । श्री साईबाबा संस्थान, शिर्डीच्या नवीन दर्शन रांगेत कर्तव्य बजावत असताना आरोग्य कर्मचारी अभिषेक सुरेश गांगुर्डे यांना ३.३५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल आढळून आले. अंदाजे ₹४५ हजार किंमतीचे हे पेंडल त्यांनी प्रामाणिकपणे संरक्षण कार्यालयात जमा केले.

संस्थानच्या संरक्षण विभागाने दागिन्याच्या मालकाचा शोध घेतला असता, ते विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथील साईभक्त नागोदाना रेड्डी यांचे असल्याचे निष्पन्न झाले. आवश्यक ओळख व खात्री करून सदर सोन्याचे पेंडल त्यांना सुरक्षितपणे परत करण्यात आले. पेंडल परत मिळाल्यानंतर साईभक्तांनी संस्थानच्या कर्मचारीवर्गाच्या प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले. कर्मचाऱ्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे श्री साईबाबांवरील आपली श्रद्धा अधिक दृढ झाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.



