ब्रेकिंग
ओझर विमानतळावर जननायक राहुल गांधींचे आगमन; युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले उत्स्फूर्त स्वागत

नाशिक । प्रतिनिधी । लोकसभेचे विरोधी पक्षनेते, विद्यार्थी व युवकांचा बुलंद आवाज तथा जननायक खासदार मा. राहुलजी गांधी यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी त्यांचे स्वागत केले.

राहुल गांधी यांच्या आगमनावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. युवकांच्या प्रश्नांना सातत्याने आवाज देणारे नेतृत्व म्हणून राहुल गांधी यांच्याकडे पाहिले जाते. यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात यांनी राहुल गांधी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांच्या भेटीमुळे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात युवकांच्या विविध प्रश्नांसाठी संघटनेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.