लौकी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाच्या सौ. दीपाली खटकाळे यांची निवड

लौकी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाच्या सौ. दीपाली खटकाळे यांची निवड


लौकी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाच्या सौ. दीपाली खटकाळे यांची निवड
कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्यातील लौकी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच किरण शेळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. पार पडलेल्या या निवडणुकीत काळे गटाच्या सौ.दिपाली विष्णू खटकाळे यांचा विजय होऊन त्यांची उपसरपंच पदी निवड झाली आहे.

लौकी ग्रामपंचायतीच्या रिक्त उपसरपंचपदासाठीची निवडणूक प्रक्रिया सरपंच आजिनाथ खटकाळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. उपसरपंचपदासाठीच्या निवडणुकीत काळे गटाकडून सौ.दिपाली विष्णू खटकाळे व कोल्हे गटाकडून भीमाबाई बाबासाहेब खटकाळे यांचे अर्ज दाखल होवून पार पडलेल्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना समसमान चार मते पडली असता. सरपंचाचे निर्णायक मत सौ.दिपाली विष्णू खटकाळे यांच्या पारड्यात पडल्यामुळे निवडणूक अधिकारी काम पाहत असलेले ग्रामसेवक संकेत शिंगाडे यांनी सौ.दिपाली खटकाळे यांचा विजय झाल्याचे जाहीर केले.आपल्या विजयाबद्दल प्रतिक्रिया देतांना सौ. दिपाली खटकाळे म्हणाल्या की, अटीतटीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयाचा आंनंद निश्चितपणे मोठा असला तरी उपसरपंचपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवून आ.आशुतोष काळे यांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला आहे, तो माझ्यासाठी केवळ पदाची संधी नसून काम करण्याची मोठी जबाबदारी आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीवर विश्वास दाखवून उपसरपंचपदावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांची मी मनापासून ऋणी आहे. काळे कुटुंबीयांनी आणि आ. आशुतोष काळे यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास हीच माझी कामाची प्रेरणा राहील. या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने लौकी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे. गावकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करून माझ्यावर सोपविलेली जबाबदारी सार्थ ठरविण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवनिर्वाचित उपसरपंच सौ.दिपाली खटकाळे यांचे मा.आ.अशोकराव काळे व आ. आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी सरपंच, सर्व सदस्य व काळे गटाचे कार्यकर्ते यांनी नवनिर्वाचित उपसरपंच सौ. दिपाली खटकाळे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सरपंच आजिनाथ खटकाळे, मावळते उपसरपंच किरण शेळके, सर्व ग्रा.प.सदस्य, राहुल खंडीझोड, ललिता इंगळे, राजेंद्र खिलारी, माधव खटकाळे, दिगंबर जाधव, सावळीराम खटकाळे, बाळासाहेब भवर, यशवंत कदम, सागर खटकाळे, दादासाहेब खटकाळे, सचिन खटकाळे, उद्धव खटकाळे, शरद भवर, अनिल भवर, किसनदेव भवर, भाऊसाहेब गोडसे, ज्ञानदेव खटकाळे, पोपट खंडीझोड, सतीष खटकाळे, शंकर खटकाळे, संदीप भवर, राजेंद्र इंगळे, आसाराम इंगळे, संदीप खटकाळे, विष्णू खटकाळे, केरू इंगळे, नारायण इंगळे, सुनिल खटकाळे, भगवान खटकाळे आदी मान्यवरांसह काळे गटाचे कार्यकर्ते व लौकी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



