ब्रेकिंग
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून पवार कुटुंबीयांचे सांत्वन

बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याबाबत प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करा
संगमनेर । प्रतिनिधी । जवळेकडलग येथील अकरा वर्षीय कृष्णा वसंत पवार याचा बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून सध्या ग्रामीण भागामध्ये बिबट्यांचे वाढते हल्ले हे चिंताजनक आहे. यामुळे नागरिक व विद्यार्थी भयभीत आहेत. यावर प्रशासन व वन विभागाने अत्यंत ठोस उपाय योजना करण्याचे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले असून त्यांनी आज जवळेकडलग येथे पवार कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

जवळेकडलग येथील वसंत पवार यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांत्वन भेट दिली यावेळी समवेत जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत रहाटळ, गुलाबराव देशमुख, राजेंद्र कडलक, गिरीश सुर्वे, नानासाहेब वामन, उत्तम सुर्वे, संजय देशमुख, सुरेश कडलग, दत्ता कडलग, गणेश कडलग, सुमित देशमुख, सौरभ कडलग, चेतन देशमुख, त्यांच्यासह गावातील कार्यकर्ते व पदाधिकारी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बिबट्याच्या भीतीने अकरा वर्षाच्या कृष्णा याचा शेजारी असलेल्या शेततळ्यात पडून मृत्यू झाला. ही घटना समजतात काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी समाज माध्यमांवरून शोक व्यक्त केला याचबरोबर तातडीने आपल्या कार्यकर्ते व यंत्रणेला संबंधित परिवाराला मदतीसाठी सूचना केल्या.जळगाव, धुळे ,पुणे ,नाशिक दौऱ्यानंतर आज माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने जवळेकडलग येथे जाऊन पवार कुटुंबियांचे सांत्वन केले. याप्रसंगी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की बिबट्याचे राज्यभरात आणि आपल्या भागात दिवसेंदिवस वाढणारे हल्ले हे अत्यंत चिंताजनक आहे यामुळे ग्रामीण भागातील नागरिक महिला विशेषता विद्यार्थी भयभीत आहे. शासनाकडे याबाबत आपण कायम पाठपुरावा केला असून या समस्येवर कायमस्वरूपी ठोस उपाय योजना होणे गरजेचे आहे.अनेक नागरिक शेतामध्ये रात्रीचे पाणी भरण्यासाठी जात असतात याचबरोबर विद्यार्थी शाळेत येत जात असतात आणि आपल्या परिसरात आणि भागामध्ये नागरिकांचे वास्तव हे जास्त वास्त्यांवरती आहे. त्यामुळे भीती जास्त वाटते. वनविभाग व प्रशासनाने याबाबत अधिक सतर्कतेने काम केले पाहिजे. मात्र त्यांची उदासीनता चिंताजनक असल्याचे ते म्हणाले याचबरोबर सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेततळ्याच्या बाजूला संरक्षण जाळी बांधून घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले तर रामहरी कातोरे म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याबाबत प्रशासनाला कायम सतर्क केले आहे. तर विष्णुपंत रहाटळ म्हणाले की आमच्या गावातील ही दुसरी घटना आहे त्यामुळे प्रशासनाने अधिक लक्ष द्यावे असे ते म्हणाले

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वडील वसंत पवार यांच्या समवेत चर्चा केली याचबरोबर इतर घरातील सदस्यांची आस्तेवाईकपणे चौकशी करून सर्वांना धीर दिला. यावेळी पवार कुटुंबीयांचे नातेवाईक व गावातील नागरिक उपस्थित होते