अध्यापनासोबत अभ्यासाची जिद्द; केंद्रप्रमुख प्रवीण खंडीझोड यांनी NET परीक्षेत मिळविले घवघवीत यश!

अध्यापनासोबत अभ्यासाची जिद्द; केंद्रप्रमुख प्रवीण खंडीझोड यांनी NET परीक्षेत मिळविले घवघवीत यश!


अध्यापनासोबत अभ्यासाची जिद्द; केंद्रप्रमुख प्रवीण खंडीझोड यांनी NET परीक्षेत मिळविले घवघवीत यश!
कोपरगांव । प्रतिनिधी । शिर्डी व सावळीविहीर केंद्राचे केंद्रप्रमुख प्रवीण खंडीझोड यांनी नुकतीच मराठी विषयातील NET (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) उत्कृष्ट गुणांसह उत्तीर्ण केली आहे. या यशामुळे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी तसेच पीएच.डी. प्रवेशासाठी त्यांची पात्रता सिद्ध झाली आहे. खंडीझोड यांनी या परीक्षेत ९९.७५ पर्सेंटाईल गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. केंद्रप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळत असतानाही त्यांनी अभ्यासासाठी वेळ देत सातत्य, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले. यापूर्वी ते कोपरगाव तालुक्यातील डागेवाडी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. आपल्या अध्यापन कार्यातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासोबतच विविध गुणवर्धक उपक्रम राबवून त्यांनी एक उपक्रमशील शिक्षक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील जबाबदाऱ्या सांभाळत उच्च शिक्षणासाठी केलेली त्यांची धडपड आणि मिळविलेले हे यश निश्चितच प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्या या यशाबद्दल गटविकास अधिकारी विवेक गुंड, गटशिक्षणाधिकारी वाळ्हळ, साईयोग फाउंडेशनचे संस्थापक डॉ. बाबासाहेब पानगळहणे, राहाता पंचायत समितीतील अधिकारी-कर्मचारी, शिक्षक, गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य, फिनिक्स अकॅडमीचे विद्यार्थी तसेच मित्रपरिवाराने अभिनंदन केले आहे.



