ब्रेकिंग

विलासराव देशमुख यांच्या स्मृतींना उजाळा; सोमैया महाविद्यालयात पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

विलासराव देशमुख यांच्या स्मृतींना उजाळा; सोमैया महाविद्यालयात पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

विलासराव देशमुख यांच्या स्मृतींना उजाळा; सोमैया महाविद्यालयात पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

कोपरगांव । प्रतिनिधी । महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या बुद्धिमत्ता, अभ्यासू वृत्ती आणि कर्तृत्वाने अमीट ठसा उमटविणारे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री स्व. विलासराव देशमुख यांची १४ वी पुण्यतिथी के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या ‘राष्ट्रीय सण उत्सव’ समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांनी स्व. विलासराव देशमुख यांच्या कार्याला उजाळा दिला. ते म्हणाले, “कै. विलासराव देशमुख हे महाराष्ट्र राज्याच्या तसेच देशाच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अत्यंत बुद्धिमान, अभ्यासू आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी केली. त्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम, सांस्कृतिक आदी विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. केंद्रीय राजकारणात गेल्यानंतरही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. गावपातळीवरील स्थानिक राजकारणातून राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेले विलासराव देशमुख हे देशातील महत्त्वाच्या राजकीय व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. त्यांच्या कार्याला विसरणे केवळ अशक्य आहे.”


प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनीही स्व. विलासराव देशमुख यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकत त्यांच्या नेतृत्वगुणांचे व महाराष्ट्राच्या विकासातील योगदानाचे स्मरण केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली. यावेळी कला शाखेचे प्रमुख डॉ. जिभाऊ मोरे, वाणिज्य शाखेचे प्रमुख डॉ. संतोष पगारे, रजिस्ट्रार डॉ. ए. सी. नाईकवाडे, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. गणेश शिंदे, राष्ट्रीय सण उत्सव समिती प्रमुख प्रा. एस. एस. नागरे, डॉ. एस. एम. देवरे यांच्यासह वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन सेवकवृंद तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!