थोरात कुटुंबाच्या शिरपेचात मानाचा तुरा; साक्षी राहुल थोरात यांची PMC मध्ये निवड

थोरात कुटुंबाच्या शिरपेचात मानाचा तुरा; साक्षी राहुल थोरात यांची PMC मध्ये निवड

थोरात कुटुंबाच्या शिरपेचात मानाचा तुरा; साक्षी राहुल थोरात यांची PMC मध्ये निवड
कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगांव तालुक्यातील जवळके येथील साक्षी राहुल थोरात यांची पुणे महानगरपालिका (PMC) येथे कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच नागरिकांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

साक्षी थोरात यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. पुणे महानगरपालिकेसारख्या प्रतिष्ठित संस्थेत अभियंता म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या कर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीयांचा तसेच परिसरातील नागरिकांचा गौरव वाढला असून, “मेहनत, जिद्द आणि चिकाटीला यशाची साथ मिळते” याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. साक्षी थोरात यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी परिसरातील नागरिकांसह सर्व स्तरातून मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.



