ब्रेकिंग

अवैध वाळू वाहतुकीवर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या कार्यालयाचा दणका; १५.२० लाखांचा मुद्देमाल जप्त!

अवैध वाळू वाहतुकीवर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या कार्यालयाचा दणका; १५.२० लाखांचा मुद्देमाल जप्त!

अवैध वाळू वाहतुकीवर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या कार्यालयाचा दणका; १५.२० लाखांचा मुद्देमाल जप्त!

राहाता । प्रतिनिधी । राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी कारवाई करत सुमारे १५ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री राहाता पोलीस पथक रात्रीच्या गस्तीदरम्यान पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना पुणतांबा गावच्या शिवारात एका इसमाकडून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पुणतांबा ते राहाता जाणाऱ्या रस्त्यावर आशाकेंद्र चौकाजवळ पोलिसांनी सापळा रचला. यावेळी राहात्याच्या दिशेने एक विनाक्रमांकाचा टाटा कंपनीचा पिवळ्या व राखाडी रंगाचा डंपर येताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी वाहन थांबवून चालकाची चौकशी केली. चौकशीदरम्यान चालकाने आपले नाव सुनील भिका पवार (वय ४६, रा. पिंपळवाडी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) असे सांगितले. वाहनाच्या हौदामध्ये वाळू भरलेली असल्याचे निदर्शनास आले. वाळू वाहतुकीबाबत वैध परवाना आहे का, अशी विचारणा केली असता चालकाकडे कोणत्याही प्रकारचा वैध परवाना नसल्याचे समोर आले.त्यानंतर वाहन मालकाबाबत विचारणा केली असता चालकाने विकास गोंदकर, रा. शिर्डी (फरार) याचे नाव सांगितले. पोलिसांनी विनाक्रमांकाच्या टाटा कंपनीच्या डंपरसह त्यातील वाळू असा एकूण १५ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त केला.याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३५८/२०२६, भा.दं.वि. कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहाता पोलीस ठाणे करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सचिन धनाड, रामेश्वर वेताळ, अनिल शेंगाळे, अक्षय भोसले तसेच पोलीस अंमलदार राजेंद्र बर्डे व वाघ यांनी केली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!