ब्रेकिंग

मनोज हासे यांना महाराष्ट्र गुण गौरव पुरस्कार

मनोज हासे यांना महाराष्ट्र गुण गौरव पुरस्कार

संगमनेर । प्रतिनिधी । जय हिंद युवा मंचचे धडाडीचे कार्यकर्ते व एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट च्या हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी मनोज हासे यांना उत्कृष्ट कामाबद्दल महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार 2026 ने गौरवित करण्यात आले आहे.राजापूर येथील रहिवासी असलेले मनोज हासे हे लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जय हिंद युवा मंच कार्य सक्रिय झाले. आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने समाज उपयोगी कामे त्यांनी केली आहेत. सध्या ती एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटलमध्ये काम करत असून आलेल्या गरजू रुग्णांना तातडीची मदत करत आहे.

रुग्णांची हक्काचे मित्र म्हणून ते काम करत असल्याने त्यांच्या कामाची दखल घेऊन शिर्डी येथील विविध चेंज फाउंडेशन यांच्यावतीने त्यांना महाराष्ट्र गुण गौरव पुरस्कार 2026 देण्यात आला आहे. शिर्डी येथील शानदार कार्यक्रमात त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी तरुण कार्यकर्ते तेजस हासे हे उपस्थित होतेमनोज हासे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात ,माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, डॉ जयश्रीताई थोरात, डॉ हर्षल तांबे डॉ.सौ मैथिलीताई तांबे, संतोष हासे यांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!