ब्रेकिंग

रस्ते विकासासाठी महानगरपालिका आणि नगरपरिषदांना ५ कोटी ५० लाखांचा निधी – पालकमंत्री विखे पाटील 

जाहिरात मो -7756045359
रस्ते विकासासाठी महानगरपालिका आणि नगरपरिषदांना ५ कोटी ५० लाखांचा निधी – पालकमंत्री विखे पाटील 

लोणी । प्रतिनिधी । राज्यातील महायुती सरकारच्या वतीने जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायत आणि महानगरपालिकेला रस्त्यांच्या विकासासाठी रस्ते अनुदान योजनेतून सुमारे ५कोटी ५०लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

रस्ते विकासासाठी महानगरपालिका आणि नगरपरिषदांना ५ कोटी ५० लाखांचा निधी – पालकमंत्री विखे पाटील 

महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महानगरपालिका तसेच नगरपालिकांना द्यावयाच्या मोटार वाहन कराच्या अभिहस्तांकित रकमा रस्ता अनुदानापोटी १५७.६०कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.यामध्ये अहील्यानगर महापालिका तसेच १४नगरपालिका नगरपंचायती करीता निधी मंजूर झाला असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.रस्ते विकास अनुदान योनजनेतून अहील्यानगर महापालिकेस ७५लाख,श्रीरामपूर नगर परीषदेस ५०लाख संगमनेर नगरपालिकेस ५०लाख कोपरगाव नगरपरिषद ५०लाख रूपये उपलब्ध होणार आहेत.राहाता शिर्डी पार्थर्डी देवळाली प्रवरा शेवगाव जामखेड श्रीगोंदा या क वर्ग नगरपालिकांसाठी प्रत्येकी अनुक्रमे ३५लाख तसेच अकोला कर्जत पारनेर नेवासा नगर पंचायती करीता प्रत्येकी अनुक्रमे २०लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री विखे पाटील म्हणाले.शासन निर्णयानूसार वितरीत करण्यात येत असलेल्या सर्व निधीचे नियंत्रण जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केले जाणार आहे.सर्व रस्त्यांची काम सार्वजनिक ठिकाणीच करण्यात येणार असून,यामुळे नागरीकांच्या प्राथमिक सुविधांची काम करता येतील. राज्यातील महायुती सरकार शहराच्या विकासाला पाठबळ देण्याकरीता वेगवेगळ्या योजनेतून निधीची उपलब्धता करून देत असून महानगरपालिका नगरपालिका निवडणुकीत मतदारांना दिलेल्या आश्वासानाची पूर्तता निश्चित होईल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!