दरोडेच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी केले जेरबंद तर तिघे झाले फरार

दरोडेच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी केले जेरबंद तर तिघे झाले फरार
दरोडेच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी केले जेरबंद तर तिघे झाले फरार
कोपरगाव । प्रतिनिधी । सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात घरफोडी, भुरटी चोरी, दरोडे, सोने साखळी चोर अशा घटना घडत असल्याने अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव ग्रामीण पोलीस ॲक्शन मोडवर आले असून नुकतीच कोपरगाव ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी लासलगाव रस्त्यावर वेळापूर गावांनजीक शुक्रवार दि २७ जून रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अज्ञात ५ लोक होंडा सिटी या चारचाकी वाहनात दरोडेच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी मिळताच त्यांनी तत्काळ आपले पोलीस पथक सदरच्या दिशेने रवाना करत सदरच्या गाडीचा शोध घेत त्यातील चेतन महेश पिंगळे वय वर्षे २५ राहणार नाशिक व नंदू राजू पिंगळे वय वर्ष २२ राहणार सुरेगाव यांना ताब्यात घेतले तर अंधाराचा फायदा घेत विकी सावळेराम काळे राहणार शहाजापूर, संदीप दादा काळे व दत्तू जानू पिंगळे राहणार सुरेगाव हे तिघे फरार झाले आहे.
तर पोलिसांनी त्यांच्याकडून फिल्डिंग कटर, लोखंडी पाईप,एम एच ०३ ए डब्ल्यू २४२९ क्रमांकाची ग्रे रंगाची होंडा सिटी कार असा मुद्देमाल जप्त केला असून फरार झालेल्या तिघांचा शोध पोलिस घेत आहे तर सदरची कौतुकास्पद कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल जयदीप गवारे, अंबादास वाघ अविनाश तमनर, ऋतिक बेनके आदींच्या पोलीस पथकाने केली आहे.