प्रेमदान चौक येथे वाहतुक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर शहर वाहतुक शाखेची विशेष कारवाई


प्रेमदान चौक येथे वाहतुक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर शहर वाहतुक शाखेची विशेष कारवाई

अहिल्यानगर । प्रतिनिधी । दि. २५/०२/२०२६ रोजी प्रेमदान चौक येथे आचानक नाकाबंदी करुन नाकाबंदी दरम्यान वाहतुक नियमभंग करणारे वाहनचालकांविरुध्द मोटार वाहन कायद्या प्रमाणे वाहनास फॅन्सी नंबर प्लेट / नंबर प्लेट नसने ७९, काळी काच ०१, लायसन्स सोबत न बाळगणे २५, लायसन्स नसणे ०१, ट्रिपल शिट वहन चालवणे ४, अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे ०१, बुलेट फटाका सायलेन्सर ०९, वाहनास नंबर प्लेट नसणे / फैन्सी नंबर प्लेट बसवणे ७२ इतर २४ आशा एकुण १२७ ई- चलान कारवाई करण्यात आलेल्या असुन २२,५००/- रु रोख दंड वसुल करण्यात आलेला असुन अनपेड एकुण दंड ८९०००/- करण्यात आलेला आहे.

सदर कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर श्री. वैभव कलूबमें, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, यांचे आदेशान्वये डॉ. दिलीप टिपरसे, उपविभागीय पोलीस अधिकरी, अहिल्यानगर शहर विभाग व शहर वाहतुक शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि / बाबासाहेब बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली अधिनस्त पोलीस अधिकारी / अंमलदार पोसई मन्सुर सय्यद, पोसई असिफ शेख, सफौ शिरसाट, पोशि, संजय शेटे, पोशि. मधुकर ससे, पोशि. सतिश दळवी, पोशि. प्रविण खंडागळे, पोशि. अजय जपकर, पोशि. आबासाहेब चव्हाणा, पोशि. ज्ञानेश्वर खराडे वॉर्डन दिशान शेख, सुदर्शन कारखेले, अरविंद चोटीले, महेश घोरपडे, यांनी कारवाई केली आहे.

तरी सर्व नागरीकांना अव्हाण करण्यात येते की, आल्पवयीन मुलांस वाहन चालवण्यास देवु नये तसेच आपल्या वाहनांच्या काळ्या काचा करणे, वाहनांना नोंदणी क्रमाक न लावणे किंवा फॅन्सी नंबर प्लेट लावने, फटाका सायलेन्सरचा वापर करणे या सारख्या वाहतुक नियमांचे भग न करता वाहतुक नियमांचे पलन नियमित पणे करण्यात यावेत.



