
सास-याचा खुन करणारा जावई त्याचे मित्रासह जेरबंद


खुनाची स्थानिक गुन्हे शाखेकडुन उकल
अहिल्यानगर । प्रतिनिधी । दिनांक 22/02/2026 रोजी दुपारी 03/00 वा.पुर्वी ढवळपुरी शिवार डोंगरात ता.पारनेर जि. अहिल्यानगर येथे फिर्यादीचा भाऊ मयत रामदास निवृत्ती सोनवणे वय- 55 वर्षे रा. निमगाव सावा, ता.जुन्नर जि.पुणे याचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी गळा आवळुन खुन करुन मारु टाकले आहे. सदर घटनेबाबत फिर्यादी तुळशीराम निवृत्ती सोनवणे वय-58 वर्षे रा. सुलतानपुर ता.जुन्नर जि.पुणे यांनी दिनांक 25/02/2026 रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन पारनेर पोलीस स्टेशन गु.र.नं. 116/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सदर उघडकीस आणुन आरोपीस तात्काळ ताब्यात घेणेबाबत आदेशीत केलेले आहे.सदर आदेशानुसार पोनि श्री किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील पोउपनि/संदिप मुरकुटे, पोलीस अंमलदार अतुल लोटके, फुरकान शेख, दिपक घाटकर, रिचर्ड गायकवाड, अमृत आढाव, रमिझराजा आत्तार, आकाश काळे, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, चालक उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार करुन सदर पथकास गुन्हा उघडकीस आणुन आरोपी ताब्यात घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना करण्यात आले होते.पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटना ठिकाणी भेट देवुन घटनास्थळाची पाहणी करुन आरोपी निष्पन्न करणे कामी माहिती काढत असतांना पथकास सदरचा गुन्हा मयताचे जावई नामे अमित नारायण डुकरे व त्याचे मित्र अमोल उत्तम डुकरे यांनी मिळुन केले असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर माहितीचे आधारे पथकाने दिनांक 25/02/2026 रोजी आरोपी नामे 1) अमित नारायण डुकरे वय-34 वर्षे रा. पारगाव तर्फे आळे, ता.जुन्नर जि.पुणे, 2) अमोल उत्तम डुकरे, वय- 31 वर्षे रा. औरंगपुर, ता.जुन्नर जि.पुणे यांना ताब्यात घेतले. ताब्यातील इसमांकडे सखोल व बारकाईने विचारपुस करता आरोपी अमित नारायण डुकरे याने मयत इसम त्याचे सासरे असुन माझी पत्नी ही सुमारे एक वर्षापासुन नांदत नसुन मला एक सव्वा वर्षाची मुलगी आहे. मयत सासरा हा वारंवार वाद घालुन माझी मुलगी हिस मारुन टाकण्याची धमकी देत होता. त्याचा राग आल्याने आरोपी नामे अमित नारायण डुकरे याने त्याचे वरील मित्र अमोल उत्तम डुकरे,याचे मदतीने मयत सासरा रामदास निवृत्ती सोवणे यास कारमध्ये घेवुन जावुन त्याचे गळा आवळुन खुन करुन त्याचे प्रेत ढवळपुरी शिवार डोंगरात फेकुन दिल्याची कबुली दिली आहे.ताब्यातील आरोपींना गुन्ह्याचे पुढील तपासकामी पारनेर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशन हे करीत आहे. सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.



