मेंगाळवाडी गावातील आदिवासी कुटुंबातील कु. राजश्री गांडाळ ठरली सफायर आयडॉल

मेंगाळवाडी गावातील आदिवासी कुटुंबातील कु. राजश्री गांडाळ ठरली सफायर आयडॉल
संगमनेर । प्रतिनिधी । लायन्स क्लब ऑफ संगमनेर आयोजित राज्यस्तरीय लायन्स क्लब सॅफ्रॉन सफायर सोलो सिंगिंग स्पर्धेत तालुक्यातील मेंगाळवाडी गावची आदिवासी कन्या कु. राजश्री भाऊसाहेब गांडाळ ही या वर्षीची सफायर आयडॉल ठरली असून तिने गावचे व तालुक्याचे नाव उज्वल केले केले असल्याचे प्रतिपादन आदिवासी ठाकर ठाकुर समाज उन्नती मंडळ संगमनेर तालुका अध्यक्ष बाळकृष्ण गांडाळ यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लायन्स क्लब ऑफ संगमनेर सातत्याने विविध स्पर्धांचे आयोजन करत असते त्याचाच एक भाग म्हणून लायन्स क्लब ऑफ संगमनेर आयोजित राज्यस्तरीय लायन्स क्लब सफायर सोलो सिंगिंग या स्पर्धेत मेंगाळवाडी सावरचोळ गावची गान कोकिळा कु. राजश्री भाऊसाहेब गांडाळ ही सफायर आयडॉल ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल नुकताच तिचा लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब मित्र मंडळ, मेंगाळवाडी,श्री ओम साई आदिवासी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, वाघोबा मित्र मंडळ, ओम साई महिला बचत गट,भगवती माता महिला मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कौतुक सोहळा आणि सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सफायर आयडॉल कु.राजश्री गांडाळ हिचा जयहिंद आदिवासी आश्रमशाळा कोळवाडे चे मुख्याध्यापक दशरथजी वर्पे सर व सौ.वर्पे मॅडम यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी कु.राजश्री चे आईवडील आदर्श माता पिता आदर्श शिक्षक सागर गांडाळ यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे वेळी आदर्श शिक्षक संजय कानवडे ,सह्याद्री आदिवासी ठाकर ठाकुर समाज उन्नती मंडळ संगमनेर तालुका अध्यक्ष बाळकृष्ण गांडाळ, एडीसीसी बॅंकेचे शाखाधिकारी धनंजय भाऊ कानवडे, एडीसीसी बॅंकेचे निवृत्त इन्स्पेक्टर मधुकर पाटीलबा कानवडे साहेब,मा.सरपंच केशवराव बिडवे,माजी पोलीस पाटील गेणू पांडुरंग मेंगाळ,मा.सरपंच लक्ष्मण मेंगाळ,मा.सरपंच सोमनाथ मेंगाळ,अकोले तालुका ठाकर नोकरदार संघटना अध्यक्ष सोमनाथ उघडे सर, सचिव चंद्रभान मेंगाळ सर,व सर्व सदस्य,ग्रा.पंचायत सदस्या ललिता बाळकृष्ण गांडाळ,ग्रा.पंचायत सदस्य तावबा मधे,ग्रा.पंचायत सदस्य संजय कातोरे,विठ्ठल कानवडे सर, पांडुरंग रामनाथ कानवडे, दिलीप जी बांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कोळवाडे आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक दशरथ वर्पे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सातत्याने विविध स्पर्धांचे आयोजन नेहमीच करण्यात येत असते. कोळवाडे येथील जय हिंद आदिवासी आश्रम शाळेमुळे आदिवासी समाजातील मुलांना शिक्षणाची मोठी संधी निर्माण झाली असून या शाळेतील अनेक विद्यार्थी गुणवत्तेमुळे आज देश व विदेशात कार्यरत आहे. लायन्स क्लब ऑफ संगमनेर च्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना कला गुण सादर करण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कुमारी राजश्री गांडाळ ही सफायर आयडॉल ठरली आहे तिचे कौतुक आहे.यावेळी वाघोबा मित्र मंडळ अध्यक्ष पंढरीनाथ मुरलीधर गांडाळ,ओम साई ग्रुप अध्यक्ष पंढरीनाथ विठोबा गांडाळ, सचिव पोपट अंतु गांडाळ,टी .एन.कानवडे सर, मा.सरपंच साहेबराव कातोरे,वसंत मेंगाळ सर, विरभद्र स्टोन क्रेशर चे संचालक भाऊसाहेब कानवडे,कंडक्टर संभाजी भुतांबरे, विरभद्र क्रिकेट क्लब चे कॅप्टन रामनाथ डोखे व सर्व टीम,खुशाल गांडाळ, रामभाऊ गांडाळ, शांताराम गांडाळ,पुणाजी गांडाळ, गोरक्षनाथ गांडाळ, नारायण गांडाळ, रमेश मेंगाळ, तान्हाजी काशिनाथ पथवे, शिवराम मेंगाळ, महेंद्र डोखे,भाऊसाहेब गांडाळ,लहानु गांडाळ, हौशिराम गांडाळ,आशा सेविका सुनंदा गांडाळ, नवनाथ मेंगाळ,शंकर मेंगाळ,पोपट भुतांबरे, भाऊसाहेब मेंगाळ,गोरक्ष मेंगाळ, सोमनाथ भुतांबरे,ओम साई ग्रुप, वाघोबा मित्र मंडळ,ओम साई महिला बचत गट,भगवती माता महिला मंडळ चे सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन करणारी सर्व सत्कार सोहळा समिती चे सर्व सदस्य हजर होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व प्रास्ताविक बाळकृष्ण गांडाळ यांनी केले तर आभार संजय कानवडे सर व धनंजय भाऊ कानवडे यांनी केले. कु. राजश्री गांडाळ हिने मिळवलेल्या या यशाबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, नगराध्यक्ष सौ. मैथिली तांबे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.



