ब्रेकिंग
स्वर्गीय आ.शिवाजीराव कर्डिले हे ग्रामीण शहाणपण असलेले नेतृत्व – बाळासाहेब थोरात
स्वर्गीय आ.शिवाजीराव कर्डिले हे ग्रामीण शहाणपण असलेले नेतृत्व – बाळासाहेब थोरात
संगमनेर । प्रतिनिधी । आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आहे. अनेक वर्ष विधानसभेत त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. जनसामान्यांची भावना जाणणाऱ्या या नेतृत्वाच्या निधनाने ग्रामीण विकासाची दृष्टी असलेले आणि ग्रामीण शहाणपण असलेले लोक नेतृत्व हरपले असल्याची भावना काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्गीय कमिटीचे सदस्य तथा मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
माजीमंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, त्यांच्या निधनाची बातमी ही अत्यंत दुःखदायक आहे. अनेक वर्षे त्यांनी विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केले. याचबरोबर राज्य मंत्रिमंडळातही दुग्धविकास मंत्री म्हणून काम केले. ग्रामीण विकासाची जाण असलेले आणि ग्रामीण शहाणपण असलेले हे नेतृत्व होते. जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी प्रभावी काम केले मुद्देगिरी असणाऱ्या आणि जन माणसांची भावना जपणारे लोक नेतृत्व हरपले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.



