ब्रेकिंग

भारतीय मुलींची कामगिरी देशासाठी अभिमानास्पद – बाळासाहेब थोरात

महिला क्रिकेटपटूंनी देशाचे स्वप्न पूर्ण केले - डॉ जयश्रीताई थोरात

भारतीय मुलींची कामगिरी देशासाठी अभिमानास्पद – बाळासाहेब थोरात

महिला क्रिकेटपटूंनी देशाचे स्वप्न पूर्ण केले – डॉ जयश्रीताई थोरात
संगमनेर । प्रतिनिधी । क्रिकेट हा भारतामध्ये अत्यंत लोकप्रिय खेळ आहे. पुरुष क्रिकेट संघाने तीन वेळेस विश्वचषक जिंकला आहे. भारतीय महिला क्रिकेटपटूंनी विश्वचषक जिंकावा हे संपूर्ण भारतीयांचे स्वप्न होते आणि काल इतिहास रचत भारतीय महिला क्रिकेटपटूंनी विश्वचषक जिंकला हे सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद असल्याचे गौरवउद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना मा. शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, क्रिकेट हा संपूर्ण जगासह भारतामध्ये अत्यंत लोकप्रिय खेळ झाला आहे. महिला क्रिकेटसाठी विश्वचषक हा अत्यंत महत्त्वाचा होता. 2017 मध्ये अगदी थोडक्यात विश्वचषकाने हुलकवणी दिली होती.यावर्षी भारतामध्ये झालेल्या विश्वचषकात सर्व साखळी सामन्यांमध्ये भारतीय संघाने अत्यंत सांगली कामगिरी केली. मेहनत जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने जगभर भारताचे नाव उज्वल केले आहे .नवी मुंबई येथील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियम मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर दैदीप्यमान विजय मिळवला. हा विजय म्हणजे भारतीय महिला संघाच्या सांघिक खेळाचा परिणाम आहे. कर्णधार हरमनप्रीत व  स्मृती मानधनासह सर्व भारतीय खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी केली. कालच्या विजयात अष्टपैलू खेळ करणारी धडाकेबाज फलंदाज शेफाली वर्मासह दीप्ती शर्माने केलेली अष्टपैलू कामगिरी महत्त्वाची ठरली.

जाहिरात – मो-7756045359

हा विजय प्रत्येक भारतीय साठी अभिमानाचा असल्याचे सांगून देशभरातील लाखो मुलींना या संघाने नवी प्रेरणा दिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकली हे आपल्या सर्वांसाठी कौतुकास्पद आहे. भारतीय मुलींनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठे नाव कमावले आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये ही महिलांची मोठी सातत्यपूर्ण कामगिरी असून  महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकणे हा देशासाठी सुवर्णक्षण असल्याचे ते म्हणाले तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, महिला विश्वचषकात कामगिरी करणाऱ्या सर्व तरुणींचे तमाम देशभरातील नागरिकांकडून अभिनंदन. खरंतर कालचा विजय हा महिलांसाठी समर्पित आहे. सेमी फायनल मध्ये जेमीमा रॉड्रिक व हरमनप्रीत ने दाखवलेली जिगरबाज खेळी. त्यानंतर काल अंतिम सामन्यांमध्ये शेफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, यांच्यासह सर्वांनी सांघिक खेळ करून देशाला विश्वचषक जिंकून दिला. संपूर्ण देशातील महिलांसाठी आणि महिला क्रिकेटसाठी हा संस्मरणीय व प्रेरणादायी विजय असल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी मा.आमदार डॉ सुधीर तांबे यांच्यासह विविध मान्यवरांनी महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन केले. महिला क्रिकेटपटूंनी  विश्वचषक जिंकल्यानंतर संगमनेर मध्ये फटाक्यांची आतिषबाजी व जल्लोष करून तरुणांनी आनंद साजरा केला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!