निळवंडे – करुले सोसायटीवर मा.मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व
काकडवाडी सह निळवंडे - करुले सोसायटी थोरात गटाच्या ताब्यात
निळवंडे – करुले सोसायटीवर मा.मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व

निळवंडे – करुले सोसायटीवर मा.मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व
काकडवाडी सह निळवंडे – करुले सोसायटी थोरात गटाच्या ताब्यात
संगमनेर । प्रतिनिधी । लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण विकासात मापदंड ठरलेल्या संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या निळवंडे,करुले सोसायटीवर मा.महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात गटाने विरोधी गटाचा 13 – 0 असा मोठा पराभव करून निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. याचबरोबर नव्याने झालेल्या सोसायटी निवडणुकीत काकडवाडीसह निळवंडे करुले सोसायटीवर थोरात गटाने मोठ्या मताधिक्याने एकहाती वर्चस्व राखले आहे.

निळवंडे करुले सोसायटी ही तळेगाव गटातील अत्यंत प्रतिष्ठेची सोसायटी आहे या सोसायटीवर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या गटाचे वर्चस्व होते 2025 – 30 या सालाकरता झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाचे 13 ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे. यामध्ये सर्वसाधारण गटातून पवार सुभाष शिवनाथ, पवार बाळासाहेब राजाराम, पवार पोपट रामभाऊ, उकिरडे रावसाहेब रामभाऊ, पवार हरिभाऊ खंडू, आहेर बाबासाहेब निवृत्ती, आहेर लहानु पुंजा, पठाण मोहम्मद खुदबुद्दीन तर महिला राखीव मधून पवार ज्योती गणेश व शेटे छाया राजाराम, भटक्या जाती विमुक्त जमाती मधून वारे भाऊसाहेब सहादू, अनुसूचित जाती जमाती मतदार संघामधून उंबरेड अशोक श्रावण, आणि इतर मागास वर्ग मतदारसंघातून पवार सुभाष शिवराम हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

या सर्व विजयी उमेदवारांनी विजयानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी येऊन त्यांची भेट घेतली. यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात व डॉ.जयश्रीताई थोरात यांनी सर्व विजय उमेदवारांचा सत्कार केला. शेतकरी विकास मंडळाच्या विजयासाठी रायभान पवार,अशोक केरे,अशोक कोल्हे, बाळासाहेब आहेर,गंगाधर पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्ञानेश्वर गोरे यांनी काम पाहिले तर सहाय्यक म्हणून मोहन पवार यांनी काम पाहिले.

या सर्व विजयी उमेदवारांचे माजीमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, ॲड.माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, डॉ.जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, महेंद्र गोडगे आदींसह विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

काकडवाडीतील नवीन सदस्यांचा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून सत्कारकाकडवाडी सेवा सोसायटीतील शेतकरी विकास मंडळाच्या सर्व विजयी 13 उमेदवारांचा सत्कार लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी त्यांनी केला. यावेळी समवेत डॉ.जयश्रीताई थोरात उपस्थित होत्या.



