वेणुबाई थोरात यांचे निधन

कोपरगांव । प्रतिनिधी ।
कोपरगांव तालुक्यातील जवळके येथील सामाजीक कार्यकर्त्या वेणुबाई सुखदेव थोरात (वय 84 वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सामाजिक व धार्मिक कार्यात त्या सक्रिय सहभागी होत्या. अत्यंत मनमिळावू स्वभावामुळे त्या परिसरात सर्वत्र परिचित होत्या. त्यांच्या मागे मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांचा जाण्याने जवळके गावात शोककळा पसरली आहे. त्याचा दशक्रिया विधी मंगळवार दिनांक 16/04/2024 रोजी शेतकरी माध्यमिक विद्यालय जवळके ( धोंडेवाडी ) येथे होणार आहे. त्याप्रसंगी ह.भ.प.शरद महाराज ढवळे यांचा प्रवचनाचा कार्यक्रम सकाळी 9:00 वाजता संपन्न होईल



