जिल्हा बँकेच्या चेअरमनपदाची चर्चा; विखे पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री ज्याला योग्य समजतील, तोच चेअरमन होईल

अहिल्यानगर । प्रतिनिधी । जिल्हा बँकेच्या संदर्भात माझ्या नावाची चर्चा सुरू आहे, हे माझ्याही कानावर येत आहे. मात्र, माझ्या विरोधात कोण आहे, मला कोणाचा त्रास आहे किंवा माझा कोणाला त्रास आहे, याची मला कल्पना नाही.माझ्या नावावर शिक्कामोर्तब व्हावं यासाठी मी कुठेही धावत नाही. मी कधीही म्हटलं आहे का की, मी जिल्हा बँकेचा चेअरमन होणार आहे? माझी भूमिका अगदी स्पष्ट आहे माननीय मुख्यमंत्री महोदय ज्याला योग्य समजतील, तोच व्यक्ती जिल्हा बँकेचा चेअरमन होईल.माझा सध्या जिल्हा बँकेच्या चेअरमनपदासाठी कोणताही संघर्ष किंवा प्रयत्न सुरू नाही. माझे प्रयत्न वेगळ्या दिशेने सुरू आहेत. जागतिक स्तरावर, विशेषतः वर्ल्ड बँकेसारख्या संस्थांमध्ये काही संधी मिळू शकते का, यासाठी मी प्रयत्न करत आहे. देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला काही काम करण्याची संधी मिळते का, हे मी पाहत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मुख्यमंत्री महोदय जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल. हीच माझी कालची भूमिका होती आणि आजही तीच भूमिका आहे.