ब्रेकिंग

इंद्रजीत भाऊ थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त जोर्वे मध्ये आरोग्य शिबिर

इंद्रजीत भाऊ थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त जोर्वे मध्ये आरोग्य शिबिर

72 नागरिकांची कॅन्सर तपासणी तर 156 पाण्याचे  जार वितरण
संगमनेर । प्रतिनिधी। सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्या वतीने गावातील गरीब महिलांना 156 पिण्याच्या पाण्याचे जार चे वितरण करण्यात आले असून वाढदिवसानिमित्त झालेल्या आरोग्य शिबिरात 72 नागरिकांनी कॅन्सर तपासणी केली आहे.

दत्त मंदिर परिसरात इंद्रजीत भाऊ थोरात मित्र मंडळ व लोकनेते बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्या वतीने एस एम बी टी सेवाभावी संस्थेच्या सहकार्यातून कॅन्सर तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण यांसह विविध सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी इंद्रजीत भाऊ थोरात, सौ आरती ताई थोरात, शरद नाना थोरात, बादशहा बोरकर ,सिताराम वर्पे, बाबासाहेब शिंदे ,संजय थोरात, विठ्ठल काकड, अनिल दिघे , डॉ अश्विनी देशमुख, अविनाश आव्हाड यांसह गावातील ग्रामस्थ नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी रक्तदान शिबिर ही संपन्न झाले या रक्तदान शिबिरात 67 नागरिकांनी रक्तदान केले स्वतः इंद्रजीत भाऊ थोरात यांनीही आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केले.यावेळी बोलताना इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, जोर्वे गावाला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गावांमध्ये सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या आहेत. जोर्वे चे नाव हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे परंतु काही मंडळी गावच्या राजकारणात गटतट करून विकास कामात अडथळे निर्माण करत आहे या अत्यंत चुकीचे आहे. युवकांनी घेतलेले उपक्रम सत्य आहे . शरद नाना थोरात जे कायम सामाजिक कामांमधून पुढे असतात याचबरोबर महिलांवर झालेले अन्यायाच्या वेळी त्यांनी कायम आवाज उठवला आहे. युवकांनी समाज कामातून आदर्श निर्माण करावा असे आवाहन त्यांनी केले.तर शरद नाना थोरात म्हणाले की, आपल्याला सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे. मात्र अन्याय झाला तर सहन करायचा नाही. या भागाच्या विकासासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी एकीने काम करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी सचिन दिघे ,सुधाकर बलसाने, नवनाथ कातोरे यांनीही आपले मनोगती व्यक्त केली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र कोल्हे यांनी केले सूत्रसंचालन रामदास काकड यांनी केले तर सोपान कोल्हे यांनी आभार मानले. यावेळी गावातील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!