ब्रेकिंग

अंजनापुरात हनुमान जयंती व अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने आरोग्य तपासणी शिबिर – बाळासाहेब गव्हाणे

अंजनापुरात हनुमान जयंती व अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने आरोग्य तपासणी शिबिर – बाळासाहेब गव्हाणे
अंजनापुरात हनुमान जयंती व अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने आरोग्य तपासणी शिबिर – बाळासाहेब गव्हाणे
कोपरगाव । प्रतिनिधी । नेहमीच सामाजिक शैक्षणिक धार्मिक कार्यात अग्रेसर असणारे आरोग्यदूत म्हणून सर्वपरिचित अंजनापुर येथील दानशूर व्यक्तिमत्व बाळासाहेब गव्हाणे पाटील तसेच दत्तात्रय गोवर्धन गव्हाणे व रोहिदास साहेबराव गव्हाणे या मित्रमंडळाच्या वतीने अंजनापूर येथील हनुमान मंदिर प्रांगणात गुरुवार दि २ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत एस जे एस हॉस्पिटल व तुलसी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने हनुमान जयंती व अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.
 आयोजित केलेल्या या महाआरोग्य तपासणी शिबिरात मेंदूच्या आजारावर, हृदयांच्या आजारावर, हाडांच्या आजारावर, दातांच्या आजारावर, डोळ्यांच्या आजारावर, जनरल सर्जरी, युरो सर्जरी, स्त्रियांचे आजार, बालकांचे आजार, कॅन्सर आदि आजारावर शिबिरात अनुभवी तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन सल्ला व आवश्यक असल्यास मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.  तसेच याप्रसंगी आरोग्यदूत बाळासाहेब गव्हाणे पाटील यांच्यातर्फे अंजनापूर व पंचक्रोशीयांसाठी ॲम्बुलन्स नवी कोरी ॲम्बुलन्स लोकार्पण  करण्यात येणार असूनही  ही ॲम्बुलन्स अंजनापुर व पंचकोशीतील सर्वांसाठी मोफत देण्यात येणार असल्याचे बाळासाहेब गव्हाणे यांनी सांगितले.
 आरोग्य दूत म्हणून सर्वपरिचित असलेले बाळासाहेब गव्हाणे यांनी अंजनापुर पंचक्रोशीतील अनेकांना आपल्या रक्तपेढीतून रक्त उपलब्ध करून देत जीवनदान दिले आहे तर ६०० हून अधिकच्या शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले आहे. तसेच परिसरातील अनेक महिलांना स्वखर्चाने देवदर्शन घडवून आणले आहे तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण देखील केलेले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!