सहकार क्षेत्रात राजेश परजणे यांचा पुन्हा ठसा; दोन संस्थांच्या व्यवस्थापन समितीवर नियुक्ती

सहकार क्षेत्रात राजेश परजणे यांचा पुन्हा ठसा; दोन संस्थांच्या व्यवस्थापन समितीवर नियुक्ती

सहकार क्षेत्रात राजेश परजणे यांचा पुन्हा ठसा; दोन संस्थांच्या व्यवस्थापन समितीवर नियुक्ती
कोपरगाव । प्रतिनिधी । गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन राजेश आबा नामदेवरावजी परजणे यांची महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद), मुंबई तसेच भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशन लिमिटेड या संस्थांच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे कोपरगावच्या सहकार व दुग्ध व्यवसाय क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.राजेश परजणे पाटील यांनी सहकार व दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विविध उपक्रम राबविले आहेत. गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून त्यांनी दूध उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवून काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या संचालकपदाची तसेच अध्यक्षपदाची जबाबदारीही मिळाली होती. २०२३ मध्ये त्यांची महानंदच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती.
विखे कुटुंबीयांकडून परजणे पाटील यांचे अभिनंदन
राजेश आबा परजणे यांची महानंदसह भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशनच्या व्यवस्थापन समितीवर सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशन तसेच सहकार क्षेत्रातील विविध संस्थांमध्ये काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. दुग्ध व्यवसाय, सहकार आणि ग्रामीण भागातील शेतकरी यांच्या प्रश्नांचा अभ्यास असलेल्या परजणे पाटील यांच्या अनुभवाचा या व्यवस्थापन समित्यांच्या कामकाजाला उपयोग होणार आहे.दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी राजेश परजणे पाटील यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.परजणे यांच्या या निवडीचे गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे सर्व संचालक मंडळ, सभासद, दूध उत्पादक शेतकरी तसेच कर्मचारी वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे. सहकार आणि दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे



