ब्रेकिंग

हक्काच्या रेल्वेसाठी क्रांतीदिनी हजारो नागरिक रस्त्यावर उतरणार

हक्काच्या रेल्वेसाठी क्रांतीदिनी हजारो नागरिक रस्त्यावर उतरणार
जाहिरात मो-7756045359

नाशिक – पुणे रेल्वे साठी चक्काजाम होणारच
संगमनेर । प्रतिनिधी । उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आणि विकासाचा महत्त्वाचा दुवा ठरणारा नाशिक – पुणे रेल्वे मार्ग हा सरळ व्हावा याकरता हजारो नागरिक क्रांती दिन रस्त्यावर उतरणार असून नाशिक पुणे महामार्ग समृद्धी महामार्ग हा 9 वाजता चक्काजाम होणार आहे.

नाशिक – पुणे मुंबई या गोल्डन ट्रँगल वरील विकासाकरता नाशिक – पुणे रेल्वे ही अत्यंत गरजेचे असून याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी 1998 पासून पाठपुरावा सुरू केला. 2000 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे पत्र व्यवहार करून सरळ रेल्वे व्हावी याकरता मागणी केली.यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालय महाराष्ट्र सरकार महारेल व रेल्वेच्या विविध विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न अंतिम टप्प्यात आणला. 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हायस्पीड रेल्वेसाठी संगमनेर तालुक्यातील 26 गावातील 285 हेक्टरचे भूसंपादन झाले. याचबरोबर शेतकऱ्यांना 684.62 कोटी रुपये वाटण्यात आले. मात्र राज्यातील सरकार बदलले आणि या सरळ रेल्वेचा मार्ग सुद्धा बदलला गेला.

यामुळे संगमनेर, सिन्नर, नारायणगाव, खेड,मंचर, चाकण, अकोले या सर्व तालुक्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली. ही रेल्वे सरळ मार्गी व्हावी याकरता आमदार सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेऊन या महामार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींच्या बैठका घेतल्या त्याचबरोबर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला तर आ सत्यजित तांबे यांनी महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा केला.ही लढाई जनतेच्या न्यायालयातून सरकारपर्यंत नेण्यासाठी आता संगमनेर तालुक्यासह सिन्नर,नाशिक,अकोले,नारायणगाव,जुन्नर,मंचर,खेड,चाकण या सर्व तालुक्यांमधील नागरिक एकवटले आहेत ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने होत असलेल्या या आंदोलनामध्ये गावोगावी मोठी जनजागृती करण्यात आली आहे. तरुणांनी सोशल मीडियाच्या द्वारे याचे महत्त्व सर्वांना सांगितले आहे. भविष्यातील रोजगार, शिक्षण शेती व्यापार या दृष्टीने हा रेल्वेमार्ग अत्यंत गरजेचा असून केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याकरता नऊ ऑगस्ट च्या क्रांती दिन हजारो नागरिक एकाच वेळी रस्त्यावर उतरणार आहे.संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नागरिक एकत्र येणार असून पद्मश्री रघुवीर खेडकर,महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्यासह कला क्रीडा व्यापार शिक्षण साहित्य या सर्व क्षेत्रातील नागरिकांनी या आंदोलनाला मोठा पाठिंबा दिला आहे. याचबरोबर सिन्नर येथील समृद्धी महामार्ग आळेफाटा नारायणगाव मंचर खेड चाकण या विविध ठिकाणीही 9 वाजता रास्ता रोको होणार आहे. या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय नेते,कार्यकर्ते महिला व युवक सहभागी होणार आहेत.रविवार नऊ ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनामध्ये भविष्यातील पिढ्यांसाठी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!