ब्रेकिंग

वांजोळी व घोडेगाव  येथे गावठी कट्टा बाळगणारे 02 आरोपीकडुन 02 गावठी कट्टे व 04 जिवंत काडतुसे हस्तगत ; स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई

वांजोळी व घोडेगाव  येथे गावठी कट्टा बाळगणारे 02 आरोपीकडुन 02 गावठी कट्टे व 04 जिवंत काडतुसे हस्तगत ; स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई

अहिल्यानगर । प्रतिनिधी । मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. सदर आदेशानुसार श्री किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/ हरिष भोये पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, दिपक घाटकर, फुरकान शेख, बिरप्पा करमल, बाळासाहेब नागरगोजे भिमराज खर्से, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक भगवान धुळे, अरुण मोरे यांचे पथक तयार करुन सदर पथकास नेवासा तालुक्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.


दिनांक 28/02/2026 रोजी नमुद पथक हे सोनई पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे नितीन उर्फ ठकण भाऊसाहेब आल्हाट रा. मोरेचिंचोरे ता.नेवासा हा चारचाकी वाहनातुन गावठ्ठी कट्टा विक्री करण्यासाठी वांजोळी शिवारात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने बातमीतील ठिकाणी वांजोळी शिवारात सापळा लावला थांबले असता. वांजोळीकडुन एमआयड़ीसीकडे एक पांढ-या रंगाची चारचाकी वाहन येतांना दिसली. तेव्हा पथकाने चारचाकी वाहन थांबविले असता. तेव्हा गाडीतील चालक वाहन थांबवुन पळुन जावुन लागला तेव्हा पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे नांव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव नितीन उर्फ ठकण भाऊसाहेब आल्हाट वय- 34 वर्षे रा. मोरेचिंचोरे ता.नेवसा जि. अहिल्यानगर असे असल्याचे कळविले. ताब्यातील इसमाची व कारची झडती घेतली असता त्याचे कब्जातुन 1) 30,000/- रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल (अग्निशस्त्र), 1000/-रु कि. चे दोन जिवंत काडतुसे, 5,00,000/-रु कि.चे मारुती सुझुकी चारचाकी वाहन असा एकुण 5,31,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी नामे नितीन उर्फ ठकण भाऊसाहेब आल्हाट याचेविरुध्द यापुर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत

अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम
1 सोनई, जि. अहिल्यानगर 60/2014 आर्म ऍ़क्ट 4/25
2 एम.आय.डी.सी.जि. अहिल्यानगर 112/2015 भा.द.वि. कलम 394,395,427,34
3 येरवडा जि. पुणे 156/2017 भा.द.वि. कलम 363,366(अ),376
4 सोनई, जि. अहिल्यानगर 352/2021 भा.द.वि. कलम 307,324,504,आर्म ऍ़क्ट 4/25
5 सोनई, जि. अहिल्यानगर 326/2021 भा.द.वि.क. 324,323,504,506,आर्म ऍ़क्ट 4/25
6 सोनई, जि. अहिल्यानगर 337/2021भा.द.वि.क.452,324,323,504 आर्म ऍ़क्ट 4/25
7 नेवासा, जि. अहिल्यानगर 915/2022 भा.द.वि. कलम 394,34
8 सोनई, जि. अहिल्यानगर 298/2022 भा.द.वि. कलम 307,324,506,आर्म ऍ़क्ट 3/25
9 भिंगार कॅम्प, जि. अहिल्यानगर 99/2024 आर्म ऍ़क्ट 3/25, 7

ताब्यातील इसमाविरुध्द पोहेकॉ/437 सोमनाथ आसमानराव झांबरे नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. 78/2026 आर्म ऍ़क्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.
तसेच वरील नमुद पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख हा चारचाकी वाहनातुन गावठ्ठी कट्टा विक्री करण्यासाठी घोडेगाव शिवारात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने बातमीतील ठिकाणी घोडेगाव शिवारात सापळा लावला थांबले असता. राजेगावकडुन घोडेगावकडे एक पांढ-या रंगाची चारचाकी वाहन येतांना दिसली. तेव्हा पथकाने चारचाकी वाहन थांबवुन चालकास ताब्यात घेवुन त्याचे नांव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख वय-31 वर्षे रा. कृष्णानगर झोपडपट्टी घोडेगाव ता. नेवासा असे असल्याचे कळविले. ताब्यातील इसमाची व कारची झडती घेतली असता त्याचे कब्जातुन 1) 30,000/- रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल (अग्निशस्त्र),1000/-रु कि. चे दोन जिवंत काडतुसे, 4,00,000/-रु कि.ची मारुती सुझुकी चारचाकी वाहन असा एकुण 4,31,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी नामे शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख याचेविरुध्द यापुर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत

अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम
1 सोनई, जि. अहिल्यानगर 77/2016 भा.द.वि.क. 324,323,504,506,34
2 सोनई.जि. अहिल्यानगर 58/2016 भा.द.वि. कलम 354,323,324,504,506
3 सोनई.जि. अहिल्यानगर 98/2016 भा.द.वि. कलम 399,402 आर्म ऍ़क्ट 4/25
4 सोनई, जि. अहिल्यानगर 111/2016 भा.द.वि. कलम 143,323,504
5 एम.आय.डी.सी,जि. अहिल्यानगर 227/2016 आर्म ऍ़क्ट 4/25
6 वाळुंज जि.छ.संभाजीनगर 166/2016 भा.द.वि.क. 379
7 सोनई, जि. अहिल्यानगर 88/2017 भा.द.वि. कलम 395,394, 506,34,34
8 सोनई, जि. अहिल्यानगर 398/2020 साथरोग का.क.2,3
9 सोनई, जि. अहिल्यानगर 172/2021 भा.द.वि.क.324,323,504,506
10 सोनई, जि. अहिल्यानगर 261/2021 आर्म ऍ़क्ट 3/25, 7/25
11 सोनई, जि. अहिल्यानगर 161/2022 भा.द.वि.क.324,323,427,504,506
12 सोनई, जि. अहिल्यानगर 108/2023 भा.द.वि.क.324,323,504,506 आर्म ऍ़क्ट 3/25
13 सोनई, जि. अहिल्यानगर 226/2023 भा.द.वि.क.143,147,149,324 आर्म ऍ़क्ट 4/25
14 शनि शिंगणापुर, अहिल्यानगर 179/2023 आर्म ऍ़क्ट 3/25, 7
15 सोनई, जि. अहिल्यानगर 214/2024 भा.द.वि.क.143,147,149,387,323
16 सोनई, जि. अहिल्यानगर 473/2024 बी.एन.एस.क. 137(2),115(2),352(2),3(5)
17 सोनई, जि. अहिल्यानगर 196/2025 बी.एन.एस.क. 118(1),115(2),352,351(2)
18 सोनई, जि. अहिल्यानगर 445/2025 बी.एन.एस.क. 189(2),189(4),191(2)(3),190,118(1)

ताब्यातील इसमाविरुध्द पोकॉ/782 किशोर आबासाहेब शिरसाठ नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. 79/2026 आर्म ऍ़क्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.
वरील प्रमाणे सोनई पोलीस स्टेशन हद्दीत दोन आरोपीविरुध्द कारवाई करुन त्यांचेकडुन 02 गावठ्ठी कट्टे व 04 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, व श्री वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!