ब्रेकिंग

साडेतीन वर्षांपासून गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी अटक

साडेतीन वर्षांपासून गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी अटक

अप्पर पोलीस अधीक्षक पथकाची कारवाई

राहाता । प्रतिनिधी । मा.श्री. सोमनाथ घार्गे साो, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर व श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर यांनी गुन्हयातील फरार व पाहिजे आरोपीचा शोध घेवुन त्यांना अटक करण्याची मोहिम हाती घेतली आहे.

राहाता पोलीस स्टेशन गु.र.नं. २४३/२०२२ भादवि कलम ३०२, ३६३, १४३, १४७, १४८, १४९,५०४,५०६ आर्म अॅक्ट ४/२५ गुन्ह्याची थोडक्यात हकिकत अशी की, दि. २९.०५.२०२२ रोजी यातील फिर्यादी यांचा मयत मुलाचे व या गुन्ह्यातील आरोपींचे लकी हॉटेल, श्रीरामपुर येथे किरकोळ कारणावरुन भांडण झाले होते. त्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपींनी एकत्र संगनमत करुन दि. ०१.०६.२०२२ रोजी नमुद गुन्ह्याच्या फिर्यादीच्या मुलाचे अपहरण करुन त्यास घरकुल, रा. आंबेडकर नगर, राहाता येथे घेवुन गेले व तलवारी, कोयते व अन्य घातक शस्त्राने छातीवर, डोक्यावर, हातावर वार करुन त्याचा खुन केला होता. सदर गुन्हातील आरोपी संजय दादु निकाळे हा गुन्हा घडल्यापासुन फरार होता.दिनांक १३/११/२०२५ रोजी सकाळी श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर यांना गोपनिय माहिती मिळाली की, राहाता पोलीस स्टेशन गु.र.नं.२४३/२०२२ भादवि कलम ३०२, ३६३,१४३,१४७,१४८,१४९,५०४,५०६ आर्म अॅक्ट ४/२५ मधील फरार आरोपी संजय दादु निकाळे, रा. आंबेडकर नगर, राहाता हा चितळी, श्रीरामपुर येथे लपुन बसला आहे. त्याअनुशंगाने अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील पो.ह. दादासाहेब लोढे, पो.ना.संदीप दरंदले, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण, पो.कॉ. अशोक गाढे यांना सदर आरोपीचा शोध घेवुन त्यास तात्काळ ताब्यात घेणेकरीता आदेशीत केले होते.त्यानंतर नमुद पथकाने चितळी, श्रीरामपुर येथे जावुन आरोपी याचा मिळालेल्या गोपनिय माहितीचे व तांत्रिक विश्लेषनाचे आधारे सापळा रचुन शोध घेतला असता आरोपी संजय दादु निकाळ हा मिळुन आला आहे. सदर आरोपी हा राहाता पोलीस स्टेशन गु.र.नं.२४३/२०२२ भादवि कलम ३०२, ३६३,१४३,१४७,१४८,१४९,५०४,५०६ आर्म अॅक्ट ४/२५० प्रमाणे गुन्हयात पाहिजे असल्याने सदर आरोपीस ताब्यात घेवुन त्यास पुढील तपासाकरिता राहाता पोलीस स्टेशनचे ताब्यात दिला आहे.सदरची कारवाई ही मा. श्री. सोमनाथ घार्गे सारे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, श्रीरामपूर यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील पो.ह. दादासाहेब लोढे, पो.ना.संदीप दरंदले, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण, पो.कॉ. अशोक गाढे यांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!