जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेत बहादरपूर शाळेची गगन भरारी

जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेत बहादरपूर शाळेची गगन भरारी


जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेत बहादरपूर शाळेची दैदीप्यमान कामगिरी
कोपरगाव । प्रतिनिधी । अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धा २०२५–२६ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बहादरपूर, ता. कोपरगाव येथील मुले व मुलींनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय यश संपादन करत सर्वाधिक बक्षिसे पटकाविण्याचा मान मिळवला आहे.

या स्पर्धेत मोठा गट – कबड्डी (मुले व मुली) या क्रीडाप्रकारात बहादरपूर शाळेच्या संघांनी उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन केले.मुलांच्या संघाने जामखेड संघाविरुद्ध झालेल्या अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात विजय मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.त्याचप्रमाणे मुलींच्या संघाने श्रीरामपूर संघाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात जिद्द, संघभावना व कौशल्य दाखवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला.तसेच लहान गटातील मुलींनी कबड्डी या क्रीडाप्रकारात उत्कृष्ट खेळ करत जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवून शाळेच्या यशात मोलाची भर घातली.याच स्पर्धेत शाळेचा विद्यार्थी सार्थक नानासाहेब गव्हाणे याने वैयक्तिक क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केली.

त्याने १०० मीटर धावणे, लांब उडी व उंच उडी या प्रकारांत जिल्ह्यात प्रथम, तर थाळीफेक या क्रीडाप्रकारात जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला. या घवघवीत यशाबद्दल शिक्षणाधिकारी भास्कर पाटील साहेब, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख मॅडम, केंद्रप्रमुख विलास भांड साहेब, मुख्याध्यापक चंद्रकांत डोंगरे, तसेच शाळा व्यवस्थापन समिती व माजी विद्यार्थी संघ, बहादरपूर यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे विशेष कौतुक केले. या यशामागे निवृत्ती बढे , लक्ष्मण पंडोरे, शरद आहेर, लांडगे मॅडम, मसुते मॅडम, गावित मॅडम, भिवसन मॅडम तसेच रामदास गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा असल्याचे सांगण्यात आले.



