ब्रेकिंग

एकाच थोरात कुटुंबातील चार भावंडांची डॉक्टर होण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल; जवळके गावाचा अभिमान!

एकाच थोरात कुटुंबातील चार भावंडांची डॉक्टर होण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल; जवळके गावाचा अभिमान!
oplus_32

समृद्धी थोरात MBBS उत्तीर्ण, तर अन्य तिघांची वैद्यकीय शिक्षणात दमदार वाटचाल!

कोपरगाव । प्रतिनिधी । ग्रामीण भागात राहूनही जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मोठी स्वप्ने साकार करता येतात, हे जवळके (ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) येथील थोरात कुटुंबातील चार भावंडांनी आपल्या शैक्षणिक यशातून दाखवून दिले आहे. एकाच कुटुंबातील दोन मुली आणि दोन मुले वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत असून, त्यापैकी कु. समृद्धी राजेंद्र थोरात हिने एमबीबीएसची पदवी यशस्वीरीत्या संपादन केली आहे. तर अन्य तिघांचीही डॉक्टर होण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे जवळके गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

oplus_32

विशेष म्हणजे, या चारही भावंडांचे पहिलीपासून बारावीपर्यंतचे शिक्षण आत्मा मलिक शैक्षणिक संकुलात झाले आहे. ग्रामीण भागातील शैक्षणिक वातावरणात शिक्षण घेत असतानाच त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर त्या दिशेने यशस्वी पाऊल टाकले.थोरात कुटुंबातील कु. समृद्धी राजेंद्र थोरात हिने एमबीबीएस पदवी प्राप्त केली असून, कु. उत्कर्षा अण्णासाहेब थोरात आणि चि. दिग्विजय राजेंद्र थोरात हे दोघे एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत आहेत. तर चि. संकल्प अण्णासाहेब थोरात हा एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे.एकाच कुटुंबातील चारही मुलांनी वैद्यकीय क्षेत्राची निवड करणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. वैद्यकीय शिक्षणाचा प्रवास हा केवळ अभ्यासापुरता मर्यादित नसून त्यासाठी प्रचंड मेहनत, सातत्य, संयम आणि आर्थिक नियोजनाचीही आवश्यकता असते. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात राहून या चारही भावंडांनी मिळवलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

oplus_32

या यशामागे आई-वडिलांनी घेतलेले कष्ट, वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, मुलांच्या शिक्षणासाठी दिलेले प्रोत्साहन आणि त्यांच्या स्वप्नांवर ठेवलेला विश्वास यांचा मोलाचा वाटा आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी दिलेली साथ आणि भावंडांनी एकमेकांना दिलेले प्रोत्साहन यामुळेच थोरात कुटुंबाने शिक्षणाच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल जवळके येथे थोरात कुटुंबातील या गुणवंत भावंडांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संजय थोरात, अनिल जवरे, राजेंद्र थोरात, अण्णासाहेब थोरात, राजीव थोरात, अण्णासाहेब भोसले, बाळासाहेब थोरात आदी ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनी चारही भावंडांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.ग्रामीण भागातील एका कुटुंबातील चार भावंडांनी वैद्यकीय क्षेत्रात निर्माण केलेली ही यशस्वी वाटचाल केवळ थोरात कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण जवळके गावासाठी अभिमानाची आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेची बाब ठरली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!