ब्रेकिंग

थोरात महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे दर्जेदार सादरीकरण

थोरात महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे दर्जेदार सादरीकरण

संगमनेर । विनोद जवरे ।

 विद्यार्थ्यांच्या उच्च गुणवत्तेबरोबर त्यांच्या विविध गुणांना वाव देण्यासाठी थोरात महाविद्यालयात सातत्याने विविध उपक्रम राबवले जात असून यावर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलन नृत्य गायन वादन विविध क्रीडा स्पर्धांसह विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्यांमधून केलेले धमाकेदार सादरीकरण संस्मरणीय ठरले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात आज विविध गुणदर्शन कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे चेअरमन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सह सेक्रेटरी दत्तात्रय चासकर, रजिस्टर आचार्य बाबुराव गवांदे ,प्राचार्य डॉ दीनानाथ पाटील ,उपप्राचार्य प्रा. डॉ. बाळासाहेब वाघ ,प्रा शिवाजी नवले, सांस्कृतिक विभागाचे प्रा. तुळशीराम जाधव, सारेगमप चा लिटल चॅम्प सारंग भालके, श्रीकांत माघाडे ,प्रा. लक्ष्मण घायवट, प्रा एम.वाय. दिघे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सारंग भालके यांनी माऊली माऊली हे गीत गाऊन विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळविला. त्यानंतर मेरे रश्के कमर गीताला सर्वांनी डोक्यावर घेतले .विद्यार्थ्यांनी सादर केलेला देवीचा गोंधळ, भांगडा, बिहू नृत्य, कोळी नृत्य याला उपस्थित आणि भरभरून दाद दिली. वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली बेटी बचाव बेटी पढाव या नाटिकेने अंगावर शहारे आणले .तर कला विभागाच्या विद्यार्थ्यांनी हास्य फवाऱ्यातून सर्वांना खळखळून हसविले.

विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले फ्युजन डान्स ला टाळ्यांचा कडकडाट झाला. तर कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली मिमिक्री आणि कोळीगीत लक्षवेधी ठरले.तबला, वादन ,गायन, ड्रम, कोंगो या वादनामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवत धमाकेदार सादरीकरण केले
याप्रसंगी बोलताना आ डॉ तांबे म्हणाले की, महाविद्यालयीन जीवन हे प्रत्येकाच्या जीवनातील एक आनंदाचा काळ असतो. याच काळामध्ये जीवनाची दिशा निश्चित होते. मुलांनी मोबाईल कडे वळण्यापेक्षा मैदानाकडे वळले पाहिजे. चांगले आरोग्य हे अत्यंत गरजेचे आहे. ताण-तणावाच्या जीवनामुळे आजाराचे प्रमाण वाढले असून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबर आपल्या कुटुंबाची आरोग्य ही जपले पाहिजे. याचबरोबर सातत्याने नवनवीन विषयाचा अभ्यास करून स्वतःला समृद्ध करावे असे आवाहनही त्यांनी केले. तर प्राचार्य डॉ दीनानाथ पाटील म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात व मा.आ.  सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने सातत्याने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. यावेळी भारत भालके प्रा ढेरे, प्रा त्रिंबक राजदेव, डॉ सुहास आव्हाड, गोरक्षनाथ पानसरे, माजी विद्यार्थी नामदेव कहांडळ आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!