शिर्डी लोकसभा मतदार संघात इच्छुक असलेले काँग्रेसचे राजेंद्र वाघमारे अपक्ष उमेदवारी करणार .
कार्यकर्त्यांनी वाघमारे यांना उमेदवारी करण्यास घातली गळ
शिर्डी लोकसभा मतदार संघात इच्छुक असलेले काँग्रेसचे राजेंद्र वाघमारे अपक्ष उमेदवारी करणार .

कोपरगांव । विनोद जवरे ।
अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा परिषद समाज कल्याणचे माजी सभापती राजेंद्र वाघमारे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस कडून गेली दोन वर्ष सातत्याने मतदार संघात कार्यरत होते.

अकोले,संगमनेर, कोपरगाव, शिर्डी,श्रीरामपूर, नेवासा या शिर्डी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये सातत्याने काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम राजेंद्र वाघमारे यांनी केले
पण ऐन वेळेस ही जागा महाविकास आघाडी मधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (उ. बा. ठा. गटाला ) गेल्याने प्रचंड अस्वस्थ व नाराज झालेले राजेंद्र वाघमारे यांच्या समर्थकांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र करत वाघमारे यांनी अपक्ष उमेदवारी करण्यासाठी दबाव आणला असून, वाघमारे यांनी देखील त्यास दुजोरा दिला व आपण निवडणूक करण्यास इच्छुक असल्याचे मत काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केले.
अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी वाघमारे यांना उमेदवारी करण्यास गळ घातली असून शिर्डी लोकसभेतील वाघमारे यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे महविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बाबतीत पेच निर्माण झाला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे कोपरगाव तालुकाध्यक्ष चंद्रकांत बागुल हे राजेंद्र वाघमारे यांना काँग्रेस पक्षाने डावलले म्हणून आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांसह राजीनामे देण्याच्या तयारीत असल्याचे खाजगीत बोलले जात आहे. एका बाजूला वाकचौरे आणि सदाशिव लोखंडे दोघांनाही इकडून तिकडे उड्या मारल्यामुळे गद्दार म्हणून संबोधले जात आहे अशात वाघमारे हे काँग्रेस पक्षाशी प्रामाणिक असून बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात त्यातच वाकचौरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून देखील वाकचौरे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात असतांनाच वाघमारे यांची अपक्ष उमेदवारी भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी अडचणीची ठरण्याची भीती राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.उमेदवारी अर्ज भरण्यास अद्याप वेळ असल्याने येणाऱ्या काळात काय काय घडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



