शेतकऱ्यांची नावे ट्रक्टर घेवुन, त्यांची फसवणुक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी केले गजाआड
शेतकऱ्यांची नावे ट्रक्टर घेवुन, त्यांची फसवणुक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी केले गजाआड

९ ट्रक्टर सह २ आरोपी अटकेत
अप्पर पोलीस अधीक्षक पथकाची आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई
श्रीरामपूर । प्रतिनिधी । फिर्यादी यांना आरोपी भालचंद्र अशोक साळवी, रा. वनकुटे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर व त्याचे साथीदार यांनी फिर्यादी यांना तुम्हांला ट्रक्टर घेण्यास मदत करतो असे सांगुन नवीन ट्रक्टरचे डाऊन पेमेंट १,०००००/- रुपये मी भरतो तसेच सदरचे ट्रक्टर तुमचे नावावर घेवुन देतो, ट्रक्टर आल्यनंतर तुम्हांला वाटल्यास ट्रक्टर माझेकडे कामाला लावा मी तुम्हाला त्या मोबदल्यात ८०,०००/- रुपये देतो तसेच पुढचा ६ महिन्याचा हफ्ता देखील भरतो. आणि सहा महिन्यासाठी ट्रक्टर वापरण्याचे मोबदल्यात तुला ३०,०००/- रुपये महिना देतो, असे अमिष देवुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांचेकडे त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, बँकेचे पासबुक, त्यांचे नावावर असलेल्ल्या शेतीचे उतारे, रेशनकार्ड असे घेवुन त्यांना L&T कंपनीचे फायनान्स कंपनीचे लोन करुन दि.०४/०६/२०२५ रोजी ट्रक्टर श्री. महाकाली शोरुम, श्रीरामपुर येथुन घेवुन दिले होते. व सदरचे ट्रक्टर दि. ०६/०६/२०२५ रोजी आरोपी यांनी फिर्यादीचे फसवणुक करुन स्वतकडे घेवुन गेले व ठरल्याप्रमाणे ८०,०००/- रुपये फिर्यादीस दिले नाहीत तसेच फिर्यादीचे फोन उचलने बंद केले त्यावेळी फिर्यादी यांना फसवणुक झाल्याचे समजल्याने त्यांनी राजुर पोलीस स्टेशन येथे दि.२९/१०/२०२५ रोजी गु.र.न. ४०१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३१६ (२), ३१८ (४) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.

श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर यांना मिळालेल्या गोपनिय माहिती, तसेच गुन्हयाचे तांत्रिक विश्लेषनावरुन सदर आरोपी हा महाराष्ट्र राज्य, उत्तर प्रदेश, बिहार राज्य येथे नेहमी जा ये करत असतो, त्यावर पाळत ठेवली असता तो दि. ०४/११/२०२५ रोजी अहिल्यानगर महाराष्ट्र येथे आल्याची समजल्याने त्यास ताब्यात घेण्याकरीता अपर पोलीस अधीक्षक, कार्यालयातील पोलीस अंमलदार समांतर तपास करत असतांना आरोपी १) भालचंद्र अशोक साळवी, रा. वनकुटे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर २) अभिजित सुनिल भांडवलकर, वय ३२ वर्ष, रा. सिव्हिल हाडको, अहिल्यानगर यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. व सदरचे ट्रक्टर हे आम्ही करण रजपुत, सिल्लोड, जि. संभाजीनगर यांना ४,०००००/- रुपये किमतीला विकला असे सांगीतले. तसेच त्यांचेकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्यांनी याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांची फसवणुक केली आहे असे सांगुन ९ ट्रक्टर व २ मोटार सायकल त्यांचे फायदयाकरीता विकली आहेत. सदर ९ ट्रक्टर पैकी १ शिर्डी, ३ अहिल्यागनर, २ श्रीगोंदा, २ नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे, १ सिन्नर, जि. नाशिक तसेच मोटार सायकल पैकी १ श्रीगोंदा व १ नारायणगाव या ठिकाणी वेगवेगळे पथके पाठवुन खालील इसमांकडुन ताब्यात घेण्यात आले आहेत,

वरील नमुद एकुण ७१,७०,०००/- रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन सदर गुन्हयात १) भालचंद्र अशोक साळवी, रा. वनकुटे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर २) अभिजित सुनिल भांडवलकर, वय ३२ वर्ष, रा. सिव्हिल हाडको, अहिल्यानगर यांना अटक करण्यात आलेले असुन त्यांचे इतर साथीदार व साक्षीदार यांचेकडे चौकशी चालु आहे. सदर गुन्हयाचा तपास स.पो.नि. दिपक सरोदे, राजुर पोलीस स्टेशन हे करत आहेत.

सदरची कारवाई ही मा. श्री. सोमनाथ घार्गे सारे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, श्री. कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील पो.हे.कॉ. दादासाहेब लोंढे, पोहेकॉ सचिन धनाड, पो. ना. संदीप दरंदले, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण, पो.कॉ. अशोक गाढे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर कार्यालयातील पोहेकों दत्तात्रय मेंगाळ, पोना बापुसाहेब हांडे, पोकों राहुल सारबंदे, राजुर पोलीस स्टेशन चे स.पो.नि. दिपक सरोदे, पोहेकॉ नरोडे, पोकॉ रत्नपारखी, पोकों परते, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोसई सागर काळे, पोहकों संदिप उदावंत तसेच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पो.नि. किरण शिंदे, पोकॉ अरुण पवार, पोकों मयुर तोडमल असे वेगवेगळया पथक तयार करुन करण्यात आली आहे.



