बहादरपुर जिल्हा परिषद शाळेची माजी विद्यार्थी संघाची कार्यकरीणी जाहीर
अध्यक्षपदी भाऊसाहेब रहाणे तर उपाध्यक्षपदी सचिन रहाणे
बहादरपुर जिल्हा परिषद शाळेची माजी विद्यार्थी संघाची कार्यकरीणी जाहीर

अध्यक्षपदी भाऊसाहेब रहाणे तर उपाध्यक्षपदी सचिन रहाणे
कोपरगाव । प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा १ ऑक्टोबर २०२५ रोजी च्या शासन निर्णयानुसार माजी विद्यार्थी सहयोगातून शाळेच्या गुणवत्ता व भौतिक सुविधांचा विकासासाठी मोठे योगदान मिळू शकते या अनुषंगाने जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याकॅभे आदेश पारित केला असून या आदेशानुसारच तब्बल १०० वर्षे जुन्या बहादरपुर जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थी संघाच्या प्रथम अध्यक्षपदी भाऊसाहेब रहाणे तर उपाध्यक्षपदी सचिन रहाणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

बहादरपुर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साईनाथ रहाणे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत माजी विद्यार्थी संघाच्या कोषाध्यक्षपदी महेश नाईकवाडे तर सदस्य म्हणून संदीप पाडेकर,विजय रहाणे,सुनिल रहाणे,बाबासाहेब खकाळे, बाबासाहेब जोर्वेकर,वैभव रहाणे,सुभाष रहाणे,बाळासाहेब रहाणे,बाबासाहेब रहाणे,रामनाथ पाडेकर आदींची निवड करण्यात आली आहे.

याप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष तसेच शाळेची माजी विद्यार्थिनी स्वाती रहाणे हिला डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे शिक्षक शरद आहेर यांनी तर सर्व नवनिर्वाचित संघाचे सरपंच,उपसरपंच यांच्यासह उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

याप्रसंगी सरपंच गोपीनाथ रहाणे,उपसरपंच रामनाथ पाडेकर, शिवसेना नेते शिवाजी रहाणे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साईनाथ रहाणे तसेच उपाध्यक्ष शिवाजी आप्पासाहेब रहाणे सर्व शालेय व्यवस्थापक संचालक मुख्याध्यापक ग्रामस्थ आदिसह मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.



