ब्रेकिंग

थोरात कृषी महाविद्यालयातर्फे खांडगाव येथे माती आरोग्य जनजागृती उपक्रम

थोरात कृषी महाविद्यालयातर्फे खांडगाव येथे माती आरोग्य जनजागृती उपक्रम

संगमनेर । प्रतिनिधी । जागतिक मृदा दिनानिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या कृषी विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी खांडगाव येथे शेतकऱ्यांसाठी माती आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन मृदा नमुना संकलनाची प्रात्यक्षिके सादर केली तसेच माती परीक्षणाचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले.

खांडगाव येथे या प्रात्यक्षिका प्रसंगी प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघ, प्रशासकीय अधिकारी प्रा.जी.बी. बाचकर यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी माती नमुना घेताना पाळावयाच्या पद्धती— जसे की नमुन्याची खोली, योग्य साधनांचा वापर, स्वच्छता, विविध स्तरांची निवड— यांची माहिती विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना दिली. याशिवाय तज्ज्ञांनी मृदा परीक्षणाचे फायदे, पोषणद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रिय पदार्थांची गरज आणि संतुलित खतांचे नियोजन याबाबत मार्गदर्शन केले.

जाहिरात मो-7756045359

कार्यक्रमा दरम्यान शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत माती आरोग्याबाबतच्या विविध शंकांचे निरसन केले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषितांत्रिक माहिती पोहोचावी या उद्देशाने आयोजित केलेला हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया उपस्थित शिक्षकांनी दिली.या प्रसंगी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.वाघ म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून माती परीक्षणासह शेतीमध्ये नवनवीन प्रयोग आणि याचबरोबर कमी पाणी आणि कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन यासाठी विद्यार्थ्यांमार्फत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे ते म्हणालेतर प्रा.जी.बी.बाचकर म्हणाले की, शेती हा व्यवसाय म्हणून स्वीकारून तरुणांनी यामध्ये नवनवीन प्रयोग केले पाहिजे. संशोधक आणि नवीन प्रयोग याबाबत मार्गदर्शन करण्याकरता कृषी महाविद्यालय आपल्यासाठी सदैव तयार असेल असे ते म्हणाले. या उपक्रमाचे लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त सौ.शरयू ताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा.व्ही.बी.धुमाळ, खांडगावचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!