एसएमबीटीचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गौरव वर्मा यांचा जागतिक सन्मान


एसएमबीटीचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गौरव वर्मा यांचा जागतिक सन्मान


एसएमबीटीचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गौरव वर्मा यांचा जागतिक सन्मान

इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. अँड्रियास ग्रुएंत्झिग यांनी मानवामध्ये पहिली कोरोनरी अँजिओप्लास्टी यशस्वीरीत्या करून हृदयरोग उपचार क्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्यांच्या कार्याची प्रेरणा जपत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या निवडक तज्ज्ञांना ही प्रतिष्ठित फेलोशिप दिली जाते.ए.सी.एल., लंडन यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय सोहळ्यात इटलीचे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अँटोनियो कोलंबो आणि झुरिच (स्वित्झर्लंड) येथील नामांकित तज्ज्ञ डॉ. बर्नहार्ड मायर यांच्या हस्ते डॉ. गौरव वर्मा यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जटिल हृदयविकार उपचार, अँजिओप्लास्टी तसेच तावी (TAVI), रोटा, आयव्हस, कॉम्प्लेक्स अन्जिओप्लास्टी सारख्या प्रगत प्रक्रियांच्या माध्यमातून रुग्णांना उच्च दर्जाची सेवा उपलब्ध करून देण्यात डॉ. वर्मा यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.या आंतरराष्ट्रीय गौरवामुळे एसएमबीटी हॉस्पिटलच्या प्रगत आरोग्यसेवेची प्रतिष्ठा अधिकच उंचावली असून संस्थेच्या व्यवस्थापन, अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगावकर, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सचिन बोरसे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. वर्मा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अँड्रियास ग्रुएंत्झिग फेलोशिप हा सन्मान माझ्यासाठीच नव्हे तर एसएमबीटी हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय टीमसाठी अभिमानाची बाब आहे. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानासह ग्रामीण व सर्वसामान्य रुग्णांना सर्वोत्तम हृदयरोग उपचार उपलब्ध करून देणे ही आमची सातत्याने चालणारी बांधिलकी आहे.
– डॉ. गौरव वर्मा, संचालक
एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूट



