स्वस्तामध्ये सोने देतो अशी अमीष दाखवुन लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद
आरोपीकडुन 6,65,000/-रु कि.चा. मुद्देमाल जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

स्वस्तामध्ये सोने देतो अशी अमीष दाखवुन लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद


आरोपीकडुन 6,65,000/-रु कि.चा. मुद्देमाल जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
अहिल्यानगर । प्रतिनिधी । फिर्यादी अरविंद सिध्दप्पा हलसांगी रा. लेन.नं.02 गणेशनगर, नारायण अपार्टमेंट वाघोली, जि.पुणे यांना दिनांक 25/02/2026 रोजी दुपारी 03/00 वा.सुमार्स शेख उर्फ बंटि संजय पाडळे रा. देवगाव ता.नेवासा याने फिर्यादचा विश्वास संपादन करुन किरण काळे रा.नेवासा तसेच 8 ते 10 इसम यांनी संगणमत करुन स्वत्तात सोने देतो असे सांगुन नेवासा येथे नेवासा कडुन श्रीरामपुरकडे जाणारे रोडवर हॉटेल शिवम जवळ कच्या रस्त्याने उजव्या बाजुला कांद्याचे चाळीमध्ये बोलावुन घेवुन माझे मित्र आदित्य नागटिळे व अशोक शहाणे व मला काठीने व लाथाबुक्याने मारहाण करुन काठी व धारदार शस्त्राचा व पिस्तुलचा धाक दाखवुन माझे रोख रक्कम ऍ़प्पल कंपनीचा मोबाईल व माझ्या मित्राचे 2 विवो मोबाईल 2 नग सोन्याच्या अंगठ्या असे एकुण 15,65,000/-रु कि.ची मुद्देमाल बळजबरीने काढुन घेतली आहे. सदर घटनेबाबत नेवासा पोलीस ठाणे गु.र.नं. 163/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310 (2), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांनी दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी तात्काळ ताब्यात घेणे बाबत श्री किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना आदेशित केले होते.त्यानुसार पो.नि. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे हरिष भोये पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, दिपक घाटकर, फुरकान शेख, बिरप्पा करमल, बाळासाहेब नागरगोजे भिमराज खर्से, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक भगवान धुळे, अरुण मोरे यांचे पथक तयार करुन सदर पथकास दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी तात्काळ ताब्यात घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले. वर नमुद पथकाने दरोड्याचे गुन्ह्यामधील आरोपींची माहिती संकलित करुन व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती काढत असतांना पथकास दिनांक 28/02/2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा शेखर उर्फ बंट्टी संजय पाडळे रा.देवगाव ता.नेवासा त्याचे इतर साथीदारास केला असुन तो नेवासा, माळी चिंचोरा फाटा परिसरात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ नेवासा ते छत्रपती संभाजीनगर जाणारे रोडवर माळी चिंचोरा फाटा परिसरामध्ये सापळा रचुन थांबले असता पथकास सदर परिसरात दोन इसम संशयीतरित्या फिरतांना दिसुन आले. तेव्हा पथकाने त्यांना शिताफिने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) शेखर उर्फ बंट्टी संजय पाडळे वय – 32 वर्षे रा. देवगाव ता.नेवासा, जि. अहिल्यानगर, 2) किरण बंडु काळे वय- 29 वर्षे रा. नागफनीवस्ती नेवासा ता.नेवासा जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. ताब्यातील शेखर उर्फ बंट्टी संजय पाडळे याचेकडे व्यवसायीक कौशल्याचे आधारे सखोल तपास करता त्याने वरील प्रमाणे गुन्हा हा त्यांचे साथीदार 3) भाऊसाहेब छगन भोसले रा.नेवासा फाटा, ता.नेवासा, 4) सचिन उर्फ गटण्या पवार रा. खळवाडी, नेवासा खु ाा ता.नेवासा व त्याचे 8 ते 9 अनोळखी साथीदार यांचेसह गुन्ह्या केल्याची कबुली दिली आहे.आरोपीचे कब्जातुन गुन्ह्याचे वेळी वापरलेली 35,000/- रुपये किमतीची एक गावठी कट्टा(अग्निशस्त्र) व दोन जिवंत काडतुसे, 30,000/-रु कि.चा एक मोबाईल, 6,00,000/- रु रोख रक्कम असा एकुण 6,65,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी नामे किरण बंडु काळे याचेविरुध्द यापुर्वी अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम
1 नेवासा, जि. अहिल्यानगर 106/2014 भा.द.वि.क.316,323,504,506,34
2 नेवासा, जि. अहिल्यानगर 42/2014 आर्म ऍ़क्ट 3/25
3 नेवासा, जि. अहिल्यानगर 47/2015 आर्म ऍ़क्ट 3/25,7
4 राहाता, जि. अहिल्यानगर 61/2016 भा.द.वि. कलम 457,380
5 राहाता, जि. अहिल्यानगर 67/2016 भा.द.वि. कलम 394,457,34
6 राहाता, जि. अहिल्यानगर 68/2016 भा.द.वि. कलम 309
7 कोपरगाव तालुका, जि. अहिल्यानगर 101/2018 भा.द.वि. कलम 224,427,34,120(ब)
8 एम.आय.डी.सी, जि. अहिल्यानगर 114/2018 भा.द.वि. कलम 452,143,147,504
9 कोपरगाव तालुका, जि. अहिल्यानगर 107/2018 भा.द.वि. कलम 396,395 मोक्का
10 गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर 162/2013 भा.द.वि.कलम 457,380
आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी नेवासा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास नेवासा पोलीस ठाणे हे करीत आहेत. सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, व श्री वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.



