मिरजगाव पोलीस स्टेशन च्या सतर्कतेमुळे वाचले 02 हरिणांचे प्राण
वन विभागाकडून 04 पुरुष व 01 महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

मिरजगाव पोलीस स्टेशन च्या सतर्कतेमुळे वाचले 02 हरिणांचे प्राण

वन विभागाकडून 04 पुरुष व 01 महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
मिरजगाव । प्रतिनिधी । मागील काही दिवसांपासून मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या चोऱ्यांचे व घरफोड्यांचे मोठ्या प्रमाणात गुन्हे घडत होते. त्या अनुशंगाने अहिल्यानगर जिल्ह्याचे मा. पोलीस अधिक्षक, मा. श्री. सोमनाथ घार्गे, अहिल्यानगर, मा. अपर पोलीस अधिक्षक अहिल्यानगर मा. श्री. वैभव कलबुर्गे, उपविभागिय पोलीस अधिकारी कर्जत उपविभाग मा. श्री. प्रविणचंद्र लोखंडे यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली मिरजगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. विजय झंजाड यांनी रात्रीच्या चोऱ्या व घरफोड्यांवर प्रतिबंध करण्यासाठी एक स्वतंत्र पथक नेमले असून सदर पथकातील अंमलदार पोकॉ/सुनिल खैरे, पोकॉ/ गोकुळ पळसे व पोकॉ/ राजेंद्र गाडे असे चांदे – बिटकेवाडी जंगल परिसरामध्ये खाजगी कारमधून दि. 03/03/2026 रोजी पहाटे 04/00 वा. सुमारास पेट्रोलिंग करत असताना 02 मोटारसायकलवर 04 पुरुष व 01 महिला संशयित रित्या आढळून आले म्हणून त्यांचा पाठलाग केला असता एका मोटर सायकल वरील 02 इसम त्यांचेकडील गाठोडे व मोटर सायकल जागीच सोडून अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. व दुसऱ्या मोटारसायकलवरील इसम त्यांचे मोटारसायकलसह पळून गेले. सदर ठिकाणी मिळून आलेल्या गाठोड्याची पाहणी केली असता त्यामध्ये 03 हरिण त्यांचे पाय व तोंड बांधलेल्या अवस्थेत मिळून आले, त्यांपैकी 02 हरिण जिवंत अवस्थेत मिळून आले व 01 हरिण मृत अवस्थेत मिळून आले. जिवंत हरिणांपैकी 01 हरिण तात्काळ नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आले असून सदरबाबत तात्काळ श्री. संकेत उगले, वनपरिक्षेत्र अधिकारी, मिरजगाव यांना कळवून श्री. संकेत उगले, वनपरिक्षेत्र अधिकारी मिरजगाव, वनरक्षक सागर वाकचौरे, आजिनाथ ननावरे, हरिभाऊ बारगजे, दिनकर लिलके असे पथक सदर ठिकाणी आल्याने सदर घटनाठिकाणी मिळून आलेली आरोपींची 01 हिरो कंपनीची मोटर सायकल, हरीण पकडण्यासाठीची जाळी, 01 दोरी, शाल, व 01 विवो कं.चा मोबाईल हँडसेट तसेच 01 जिवंत हरिण व 01 मृत अवस्थेतील हरिण असा मुद्देमाल वनविभागाचे अधिकारी यांचे ताब्यात देण्यात आला असून वनविभागाचे अधिकारी सदरचा मुद्देमाल पंचनामा करून ताब्यात घेतला असून त्यांनी 04 पुरुष व 01 महिला संशयित आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली असून सदरबाबत वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा रजि. नं. 06/2026 प्रमाणे त्यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास वनविभागाचे अधिकारी व अंमलदार हे करीत आहेत.
सदर कामगिरी ही पोलीस अधीक्षक, मा. श्री. सोमनाथ घार्गे, अहिल्यानगर, अपर पोलीस अधिक्षक अहिल्यानगर मा. श्री. वैभव कलुबर्मेर्े, उपविभागिय पोलीस अधिकारी कर्जत उपविभाग मा. श्री. प्रविणचंद्र लोखंडे यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली मिरजगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक मा. श्री. विजय झंजाड, पोकॉ/ सुनिल खैरे, पोकॉ/ गोकुळ पळसे, पोकॉ/ राजेंद्र गाडे अशांनी व वनविभागाचे श्री. संकेत उगले, वनपरिक्षेत्र अधिकारी मिरजगाव, वनरक्षक सागर वाकचौरे, आजिनाथ ननावरे, हरिभाऊ बारगजे, दिनकर लिलके अशांनी मिळून केली आहे. पुढील तपास वन्य जीव सुरक्षा अधिनियम अंतर्गत वनविभागाचे अधिकारी व अंमलदार करीत आहेत.



