कोपरगाव नगरपरिषदेला ०१ कोटी निधी मंजूर – आ.आशुतोष काळे

कोपरगाव नगरपरिषदेला ०१ कोटी निधी मंजूर – आ.आशुतोष काळे


कोपरगाव नगरपरिषदेला ०१ कोटी निधी मंजूर – आ.आशुतोष काळे
कोपरगांव । प्रतिनिधी । हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियाना अंतर्गत कोपरगाव नगरपरिषदेला शाळा, महिला आरोग्य व इतर नागरी सुविधा पुरवण्यासाठी ०१ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सामाजिक, सांस्कृतिक व लोककल्याणाच्या क्षेत्रात दिलेले व्यापक योगदान विचारात घेऊन त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील नागरी स्थानिक संस्थांमध्ये सर्वांगीण नागरी विकास साधण्यासाठी नागरी लोककल्याण अभियान राबविण्याचा महायुती शासनाचा मानस आहे. या अनुषंगाने नागरी स्थानिक संस्था क्षेत्रातील शाळांची विशेषतः मराठी शाळांची गुणवत्ता वृध्दी, आरोग्याच्या विशेषतः महिला आरोग्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करणे, पर्यावरण व नागरी स्वच्छता, पर्यटन विकास तसेच नागरी स्थानिक संस्थांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहन देणे या उद्देशाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान राबविण्यात येणार असून सदर अभियानांतर्गत विकसित करण्यात आलेल्या नागरी सुविधांची विभाग स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.त्यासाठी राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान राबविण्यासाठी प्रत्येकी ०१ कोटी निधी देण्यात आला असून यामध्ये कोपरगाव नगरपरिषदेला देखील ०१ कोटी निधी देण्यात आला आहे. त्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री ना.सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे कोपरगावकरांच्या वतीने आभार मानले आहे.



