ब्रेकिंग

मा आ डॉ तांबे यांनी ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीची घेतली भेट

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून ॲसिड हल्ल्याचा तीव्र निषेध

मा आ डॉ तांबे यांनी ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीची घेतली भेट

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून ॲसिड हल्ल्याचा तीव्र निषेध

गुन्हेगाराला तातडीने अटक करा –
मा आ डॉ तांबे
संगमनेर । प्रतिनिधी । वडगाव पान येथील तेरा वर्षीय लहान मुलीवर अज्ञात इसमाने केलेल्या ऍसिड हल्ल्याचा तीव्र निषेध करत या घटनेतील आरोपीला तातडीने अटक करावी अशी आग्रही मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे मा आ.डॉ सुधीर तांबे यांनी केली आहे. याचबरोबर लहान मुलीवर झालेला ॲसिड हल्ला अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया मा शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली असून या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून हल्ल्याचा तीव्र निषेध

वडगाव पान येथील शालेय विद्यार्थिनी याच्यावर झालेल्या ॲसिड हल्ल्याचा माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तीव्र निषेध केला असून ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची म्हटले आहे. गुन्हेगार हा कोणत्याही जाती धर्माचा नसून तो गुन्हेगाराचा असतो . पोलीस प्रशासनाने तातडीने गुन्हेगाराला अटक करावी, अशा गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे वडगाव पान येथील तेरा वर्षीय चिमुकलीची मा आमदार डॉ तांबे यांनी भेट घेतली. त्याचबरोबर तिच्या नातेवाईकांना धीर दिला. त्यानंतर तातडीने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधून तातडीने या गुन्हेगाराला अटक करण्याची मागणी त्यांनी केली.बोलताना माजी आमदार डॉ तांबे म्हणाले की, महाराष्ट्राला एक पुरोगामी विचारधारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा , सावित्रीबाई फुले,अहिल्यादेवींचा हा महाराष्ट्र आहे. अशा महाराष्ट्रात अशा घटना घडणे अत्यंत निंदनीय आहे. शाळेतून ही मुलगी घरी जात असताना तिच्यावर हल्ला झाला. महिला व लहान मुलींच्या बाबत सर्व समाजाने अत्यंत जागृत राहिले पाहिजे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले पाहिजे याचबरोबर शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असणे अत्यंत गरजेचे आहे.या ऍसिड हल्ले प्रकरणातील गुन्हेगाराला तातडीने शोधून अटक करा याचबरोबर त्याला कठोरातील कठोर शिक्षा करा अशी मागणी करताना माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी नातेवाईकांचे सांत्वन करत त्या सर्वांना धीर दिला याचबरोबर सर्व डॉक्टरांशी संवाद साधून या चिमुकलीवर तातडीने चांगले उपचार करण्याबाबत माहिती घेतली

उपचाराचा खर्च एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट करणार

ऍसिड हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या तेरा वर्षीय चिमुकलीच्या दवाखान्याचा व उपचारांचा सर्व खर्च एसएमबीटी सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात येणार असल्याचा धीर मा. आ. डॉ सुधीर तांबे यांनी जखमी मुलीच्या कुटुंबीयांना व नातेवाईकांना भेटून दिला आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!