ब्रेकिंग

पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थेला २.१७ कोटीचा ढोबळ नफा

पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थेला २.१७ कोटीचा ढोबळ नफा

जाहिरात मो-7756045359
पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थेला २.१७ कोटीचा ढोबळ नफा

कोपरगांव । प्रतिनिधी । सहकारी पतसंस्था क्षेत्रात आपल्या पारदर्शक कारभाराने आणि विश्वासाहर्तेने स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेने ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक कामगिरी केली आहे. २०२५-२६ आर्थिक वर्षात पतसंस्थेला २ कोटी १७ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला असून सर्व तरतुदी करून निव्वळ नफा १ कोटी १४ लाख रुपये इतका झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे यांनी दिली आहे.संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख मांडताना चेअरमन देवेंद्र रोहमारे यांनी सांगितले कीसरत्या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवींमध्ये तब्बल २१.६० टक्क्यांची मोठी वाढ झाली असून एकूण ठेवींचा आकडा ५३ कोटी २४ लाखांवर पोहोचला आहे. संस्थेने कर्ज वाटपाचे धोरणही संतुलित ठेवले असून आजमितीस ४० कोटी ६८ लाख रुपयांचे कर्ज गरजवंतांना वितरण करण्यात आले आहे. संस्थेचे आर्थिक पाया मजबूत असल्याचे सिद्ध करणारे महत्त्वाचे गमक म्हणजे संस्थेकडे राखीव निधी व इतर फंड एकूण १३ कोटी ७२ लाख रुपयांचे आहे. तसेच संस्थेचे वसूल भागभांडवल १ कोटी ३३ लाख रुपये असून संस्थेची ३० कोटी ३३ लाख रुपयांची भरीव गुंतवणूक आहे.बँकिंग क्षेत्रात एनपीए कर्जाचे प्रमाण हा चिंतेचा विषय असताना देखील पतसंस्थेने मात्र यावर प्रभावी नियंत्रण मिळवले आहे. संस्थेचे थकबाकीचे प्रमाण केवळ १.३४ टक्के असून ढोबळ एनपीए ३.५२ टक्के आहे. संस्थेने आपला निव्वळ एनपीए सातत्याने ०% राखण्याची परंपरा याही वर्षी कायम ठेवली आहे. संस्थेच्या या उत्कृष्ट कारभाराची दखल घेत आजवर संस्थेला ब्ल्यु रिबीन आणि दीपस्तंभ यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.पतसंस्थेच्या यशाबद्दल माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांनी संस्थेचे चेअरमनव्हा. चेअरमनसर्व संचालक मंडळमुख्य व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. सहकार तत्त्वाचे पालन करत सभासदांचे हित जोपासल्याबद्दल त्यांनी संस्थेचे कौतुक करून आगामी आर्थिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 सहकारी पतसंस्था चळवळीत सर्वसामान्य ग्राहक, कर्जदार, ठेवीदार आणि सभासद यांच्या विश्वासास पात्र ठरत संस्था सातत्याने पुढे जात आहे. माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनामुळे संस्थेला भक्कम दिशा मिळाली असून संस्था प्रगतीच्या मार्गावर ठामपणे मार्गक्रमण करीत आहे.

संस्थेने डिजिटल प्रणालीचा अवलंब करून ग्राहकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पारदर्शक व्यवहारातून संस्थेचा स्वतःचा एक विश्वासू ग्राहकवर्ग तयार झाला आहे. या ग्राहकांचा विश्वास जपत यापुढील काळातही संस्था कायम प्रगती साधत राहील.मुख्य व्यवस्थापक मंगेश देशमुख

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!