ब्रेकिंग

प्रा.बाबासाहेब गवते राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र भूषण आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

प्रा.बाबासाहेब गवते राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र भूषण आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

जाहिरात मो-7756045359
प्रा.बाबासाहेब गवते राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र भूषण आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

लोणी । प्रतिनिधी । समता प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यात, शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रा.बाबासाहेब जालिंदर गवते यांना यंदाचा मानाचा “महाराष्ट्र भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.अत्यंत दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्या. आमदार सत्यजित तांबे उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते गवते यांना सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.



यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार सत्यजित तांबे यांनी श्री.गवते यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, ​“समाज घडविण्याच्या प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका कणा मानली जाते. प्रा.बाबासाहेब गवते यांनी आपल्या ज्ञानदानाबरोबरच कर्तृत्वातून विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. अशा निष्ठावान शिक्षकांचा सन्मान करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. त्यांचे कार्य इतर शिक्षकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि विविध सामाजिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.बाबासाहेब गवते यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्या सत्काराला उत्तर देताना प्रा.गवते यांनी हा पुरस्कार आपल्या विद्यार्थ्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या प्रेमाचे प्रतीक असून हा पुरस्कार विद्यार्थ्यांना समर्पित केला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!