ज्योती सहकारी पतसंस्थेचा मार्च २०२६ अखेर ६७४ कोटींचा एकत्रीत व्यवसाय – अँड. रविकाका बोरावके

ज्योती सहकारी पतसंस्थेचा मार्च २०२६ अखेर ६७४ कोटींचा एकत्रीत व्यवसाय – अँड. रविकाका बोरावके

ज्योती सहकारी पतसंस्थेचा मार्च २०२६ अखेर ६७४ कोटींचा एकत्रीत व्यवसाय – अँड. रविकाका बोरावके

कोपरगांव । प्रतिनिधी । नुकत्याच झालेल्या २०२५-२६ या आर्थिक वर्षात ज्योती सहकारी पतसंस्थेला ४ कोटी 50 लाख रु चा नफा झाला आहे. यामध्ये ४०६ कोटी रूपयांच्या ठेवी तर २६८ कोटी रुपयांची कर्ज वितरीत केली आहे. संस्थेची गुंतवणूक १६४ कोटी रूपयांची इतकी झाली आहे. संस्थेचा एकत्रित व्यवसाय ६७४ कोटी इतका झाला आहे ०.००% एन.पी.जे मुळे आपल्या ठेवी याच संस्थेत्त १००% सुरक्षित आहे अशी खात्री ठेवीदारांना झाली आहे व ग्राहकाच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन अॅड. श्री. रविकाका बोरावके यांनी दिली.

सभासद व ठेवीदारांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने संस्थेच्या भागभांडवलात व व्यवसायात समाधानकारक वाढ झाली आहे. लेखापरिक्षण वर्गात सातत्य राखण्यासाठी आवश्यक प्रमाणके संस्थेने पुर्ण करून सन २०२४-२५ या मागील आर्थिक वर्षासाठी शासकीय लेखा परिक्षणात ‘अ’ वर्ग मिळवला आहे. संस्थेने आवश्यक ती प्रमाणके पूर्ण करून ठेवी, कर्जे, भागभंडवल व गुंतवणूक या सर्वामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे संस्थेच्या ३८ वर्षाच्या वाटचालीमध्ये सातत्याने विश्वास वाढतच चाललेला आढळून येतो, आपल्या चोख व्यवहारामुळे संस्थेस “सर्वात्तम पतसंस्था पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्रतील एक अग्रगण्य पतसंस्था म्हणून ही ओळख निर्माण झाली आहेकर्ज वसुलीसाठी काही कर्जदाराबरोबर कठोर निर्णय घ्यावे लागले, मात्र त्यामुळे कर्ज वसुली चांगली झाली यापुढे यात सातत्य राखले जावुन नेहमीच ठेवीदारांच्या हिताला प्राधान्य दिलेले आहे. तसेच संस्थेने सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. व पुढेही घेत राहील अशी माहिती संस्थेचे चेअरमन अॅड. श्री. रविकाका बोरावके यांनी दिली.संस्थेच्या प्रगतीत सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार व ज्योती मंगल ठेव प्रतिनिधी, संस्थेचे सर्व संचालक, शाखधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे. असे संस्थेचे चेअरमन अड. श्री. रविकाका बोरावके यांनी सांगितले.संस्थेच्या आर्थिक प्रगतीबाबत मागील वर्षाच्या तुलनेत ठेवी मध्ये 46 कोटी, रुपयांची वाढ झाली असून तिचे प्रमाण १३% आहे तसेच कर्जामध्ये 33 कोटी रुपयांची इतकी वाढ झाली असून तिचे प्रमाण १४% व गुंतवणूकीमध्ये १६% इतकी वाढ झाली आहे, अशी माहिती संस्थेचे व्यवस्थापक श्री. सुरेश शिंदे यांनी दिली.संस्थेच्या एकूण व्यवसाय ६७४ कोटी इतका झाला असून त्याचे प्रमाण १३% इतकी वाढ झाली आहे. संस्थेचा नेट एन.पी.ओ ०.००% राखण्याची परंपरा कायम ठेवली आहे. तसेच सहकार खातेचे नियमाचे पालन केलेले आहे. अशी माहिती संस्थेचे असि. मॅनेजर श्री. सुनील क्षिरसागर यांनी दिली.
—————–
तपशील
२०२४-२०२५
२०२५-२०२६
ठेवी
३६० कोटी
४०६ कोटी
कर्ज
२३५ कोटी
२६८ कोटी
गुंतवणूक
१२८ कोटी
१६४ कोटी
थकबाकी (NPA)
0.00%
०.००%
सिडी रेशो
६५%
६६%



