के. जे. सोमैया महाविद्यालयात सोमवारी भूगोल व वाणिज्य अभ्यास मंडळाची कार्यशाळा
के. जे. सोमैया महाविद्यालयात सोमवारी भूगोल व वाणिज्य अभ्यास मंडळाची कार्यशाळा


के. जे. सोमैया महाविद्यालयात सोमवारी भूगोल व वाणिज्य अभ्यास मंडळाची कार्यशाळा
कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भूगोल व वाणिज्य अभ्यास मंडळ व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि.18 मे 2026 रोजी ‘पाठ्यक्रम निर्मिती’ या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी दिली. या कार्यशाळेचे उद्घाटन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.अशोकराव रोहमारे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. सुनिता डाकले तसेच या दोनही अभ्यास मंडळाचे सर्व सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांच्या हस्ते संपन्न होणार आहेत. या कार्यशाळेच्या दिवसभरातील विविध सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भूगोल व वाणिज्य अभ्यास मंडळातील सदस्यांनी तयार केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणः 2020 तृतीय वर्ष अभ्यासक्रमाचे प्रस्तुतिकरण व त्यावरील शंकेचे निरसन होणार आहे. उपस्थित प्राध्यापकांच्या वतीने आलेल्या सूचनांचा समावेश अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे. वाणिज्य विभागाच्या वतीने पाठ्यक्रम निर्मिती या विषयावर घेतली जाणारी तालुक्यातील पहिली कार्यशाळा असून भूगोल विभागाने यापूर्वीही अशी कार्यशाळा महाविद्यालयात आयोजित केलेली होती.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भूगोल व वाणिज्य अभ्यास मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यशाळेसाठी अहिल्यानगर, पुणे व नाशिक जिल्हातील या दोनही विषयाच्या बहुसंख्य प्राध्यापकांनी उपस्थित रहावे असे आवाहन वाणिज्य शाखेअंतर्गत कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग अभ्यास मंडळाचे सदस्य व वाणिज्य विभागप्रमुख डॉ. संतोष पगारे, भूगोल अभ्यास मंडळाचे सदस्य व विभागप्रमुख डॉ. गणेश चव्हाण यांनी केले आहे.


