मा.मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पिंपरने येथे जाऊन ठोंबरे कुटुंबीयांचे केले सांत्वन



ठोंबरे दाम्पत्याच्या मृत्यूची घटना हृदय हेलवणारी – माजीमंत्री बाळासाहेब थोरात
पिंपरने येथे ठोंबरे कुटुंबीयांची मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली. यावेळी समवेत ज्येष्ठ नेते सुधाकर रोहम, शरद नाना थोरात, अण्णासाहेब राहींज, दादासाहेब देशमुख, राजेंद्र देशमुख, बाबासाहेब राहींज,दिनकर वाकचौरे, देवराम वाकचौरे,नंदू ठोंबरे,संजय बागुल,अरुण देशमुख, प्रसाद मांडे,भास्कर ठोंबरे, प्रभाकर ठोंबरे,कृष्णा काळे, संजय ठोंबरे यांच्यासह गावातील कार्यकर्ते व युवक उपस्थित होते.

यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी मयत सचिन यांची आई श्रीमती ताराबाई, भाऊ योगेश कैलास ठोंबरे यांच्यासह सर्व कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. नाशिक जिल्ह्यातील म्हसरूळ मखमलाबाद परिसरात वास्तव्यास असणारे सिव्हिल इंजिनीयर सचिन ठोंबरे आपल्या कुटुंबीयांसह सुट्टी निमित्त हरसुल त्रंबकेश्वर जवळील कश्यपी धरण्यावर फिरण्यासाठी गेले. सायंकाळच्या वेळेस पोहण्यासाठी पाण्यात गेले असताना त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने सचिन ठोंबरे यांच्या पत्नी सौ.रोहिणी ठोंबरे व त्यांच्या शेजारी राहत असलेले व त्यांच्या समवेत फिरण्यासाठी आलेले केतन व कौशल पवार हे बंधू पाण्यात बुडाले. ठोंबरे दाम्पत्याची अवघी दोन वर्षाची चिमुकली पाण्याच्या बाहेर असल्याने रडत होती. यावेळी शेजारून जाणाऱ्या संगीता घाडगे या महिलेने या लहान मुलीला पाहिल्याने त्यांनी धावत मुलीला वाचवले याचबरोबर या घटनेची माहिती स्थानिकांना दिली स्थानिकांनी अनेक प्रयत्न केले. मात्र तत्पूर्वी या चौघांचेही मृत्यू झाले होते. या घटनेची बातमी समजतात पिंपरनेसह संपूर्ण संगमनेर तालुक्यात व जिल्ह्यात मोठी हळहळ निर्माण झाली.

याचबरोबर मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्र्यंबकेश्वर परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना तातडीने घटनास्थळी पाठवून मदत करण्याच्या सूचना दिल्या.अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्यावर पिंपरणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावेळी मा.मंत्री थोरात म्हणाले की, झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि हृदय हेलावून टाकणारी आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने अत्यंत सुशिक्षित असलेला सचिन व सर्व कुटुंबीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रत्येकाने काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाची असून या कुटुंबीयाला जास्तीत जास्त मदत मिळावी याकरता शासकीय यंत्रणेला सूचना केल्या आहेत. यावेळी गावातील नागरिक व ठोंबरे कुटुंबीयांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



