ब्रेकिंग

पोहेगावच्या पाटीलमळ्यात शेकडो मासे मृतावस्थेत; पाण्यात दुर्गंधी

पोहेगावच्या पाटीलमळ्यात शेकडो मासे मृतावस्थेत; पाण्यात दुर्गंधी

जाहिरात मो-7756045359

पोहेगावच्या पाटीलमळ्यात शेकडो मासे मृतावस्थेत; पाण्यात दुर्गंधी

कोपरगाव । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव परिसरात असलेल्या पाटीलमळा येथील नदीच्या बंधाऱ्यात शेकडो मासे मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
दिनांक २७ मे रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बंधाऱ्याशेजारीच मळ्यात राहणारे शेतकरी विलास रोहमारे यांच्या ही बाब निदर्शनास आली. बंधाऱ्याच्या संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून पाण्यावर शेकडो मृत मासे तरंगताना दिसत आहेत. साधारण तीन किलोच्या आसपास वजनाचा एक मासा असावा, अशी शक्यता रोहमारे यांनी व्यक्त केली.


या बंधाऱ्याच्या आजूबाजूला अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी व बोअरवेल आहेत. याच विहिरीतील पाणी जनावरांना पाजण्यासाठी व घरगुती वापरासाठी घेतले जाते. मृत माशांमुळे पसरलेल्या दुर्गंधीमुळे अथवा बंधाऱ्यातील पाण्यामुळे हे पाणी दूषित होऊ नये, अशी गंभीर भीती तेथील शेतकऱ्यांना सतावत आहे. तसेच जी जनावरे बाहेर चरायला जातात ती अनेकदा नदीचे पाणी पितात. दूषित पाणी पिऊन जनावरांना बाधा होऊ नये, अशी शक्यताही शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात, तेही मोठ्या आकाराचे मासे अचानक कसे मृत झाले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या गंभीर प्रकाराची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी. पाण्याचे व मृत माशांचे नमुने तपासून नेमके कारण शोधावे. अहवाल जाहीर करून शेतकऱ्यांना चिंतामुक्त करावे व पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी पाटीलमळा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!