ब्रेकिंग

मारलेली मिठी आणि आजोबा-नातवाच्या इतिहासाला उजाळा तनपुरेंच्या पक्षप्रवेशात रंगला दोन ‘दादां’चा अलिंगन सोहळा

मारलेली मिठी आणि आजोबा-नातवाच्या इतिहासाला उजाळा तनपुरेंच्या पक्षप्रवेशात रंगला दोन ‘दादां’चा अलिंगन सोहळा

अहिल्यानगर । विनोद जवरे । भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज शरद पवार पक्षाचे माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. मुंबईतील पक्ष कार्यालयात झालेल्या या सोहळ्यासाठी राहुरी, पाथर्डी व नगर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डाँ. सुजय विखे पाटील यांचा मुत्सद्दीपणामुळेच तनपुरेंचा भाजप प्रवेश झालाय, यावर या कार्यक्रमात शिक्कामोर्तब झाले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तनपुरेंसारखा प्रश्नांची जाण असलेला तरुण नेता पक्षात आल्यामुळे पक्षाला फायदाच होईल, हे आवर्जून सांगितलं.

पक्षप्रवेशानंतर तनपुरे यांनी अगोदर चव्हाण यांचा व त्यानंतर डाँ. सुजय विखेंचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याच सत्कारानंतर दोन दादा एकत्र आले, आजोबानंतर आता नातूही एक झाले याची आठवण आवर्जून काढली. त्यावेळी एकच हाशा पिकला. सुजय विखे व प्राजक्त तनपुरे यांनी लोकसभेला एकमेकांच्या विरोधात काम केलं होतं. परंतु आता तनपुरे-विखे ही नवी युती राहुरीच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरेल, अशा विश्वास तनपुरेंच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. तनपुरे यांना मिठी मारण्याची कार्यकर्त्यांची इच्छाही सुजय विखेंनी पूर्ण केली. त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला. हे सगळा पक्षप्रवेश पाहिल्यावर तनपुरेंना विखेंनीच भाजपमध्ये आणलंय, यावर शिक्कामोर्तब झालं. या पक्षप्रवेशानंतर राहुरीची गणिते नक्कीच बदलतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!