ब्रेकिंग

साक्षी थोरात हिची साहाय्यक अभियंता पदाला गवसणी

साक्षी थोरात हिची साहाय्यक अभियंता पदाला गवसणी

जाहिरात मो-7756055359

जवळके ग्रामस्थांच्या वतीने सत्कार संपन्न

कोपरगांव । विनोद जवरे ।

कोपरगांव तालुक्यातील जवळके येथील साक्षी राहुल थोरात हिची विद्युत पारेषण कंपनीत साहाय्यक अभियंता सिव्हिल पदावर निवड झाल्याबद्दल जवळके ग्रामस्थांच्या वतीने साक्षीचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जवळके सारख्या ग्रामीण भागातून जाऊन जिद्द,चिकाटी व संघर्षाच्या जोरावर साक्षी ने यश संपादन केले निश्चितपणे इतर विद्यार्थी – विद्यार्थिनी आदर्शवत आहे.आपल्या परिसरातील अनेक युवक स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होत असल्याने परिसराचे नाव नक्कीच उंचावत आहे. यावेळी माजी चेअरमन लक्ष्मण दादा थोरात, भास्कर तात्ता थोरात, डॉ.शाम दिघे, सविता दिघे (वनरक्षक, राहता डीव्हिजन), अरुण सरवार (PSI), आप्पासाहेब थोरात( Chief Operator, Mahadiscom),राहुल थोरात ( वरिष्ठ विभाग अभियंता मध्ये रेल्वे ), शिवाजी थोरात, बाळासाहेब पाचोरे, बाबासाहेब थोरात (Chief Operator, Mahadiscom), गिरीश पाचोरे(सहायक कार्यकारी अभियंता, महापरेषण), सरपंच अश्विनी पचोरे ,विक्रम पाचोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

विद्यार्थी- विद्यार्थिनी टीव्ही व मोबाईलच्या अति वापरापासून दूर राहून गरजे पुरताच मोबाईलचा वापर करावा त्याचबरोबर परिश्रम व प्रामाणिक पणे काम केल्याशिवाय पर्याय नाही कोणतेही काम निष्ठेने करा – साक्षी राहुल थोरात

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!