9 ऑगस्ट च्या चक्काजाम आंदोलनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पाठिंबा
पद्मश्री रघुवीर खेडकर, महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर सहभागी होणार

9 ऑगस्ट च्या चक्काजाम आंदोलनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पाठिंबा


पद्मश्री रघुवीर खेडकर, महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर सहभागी होणार
संगमनेर ( प्रतिनिधी ) नाशिक – पुणे सरळ रेल्वे मार्गे व्हावी याकरता मोठे जन आंदोलन उभे राहत असून रविवारी 9 ऑगस्ट क्रांती दिन होणाऱ्या चक्काजाम आंदोलनामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांच्या अहवालानंतर राजकीय,सामाजिक, व्यापारी, क्रीडा, कला, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला असून हे आंदोलन नक्कीच भव्य दिव्य आणि दिशादर्शक ठरणार आहे. जन आंदोलनाच्या रेटयामुळे केंद्र व राज्य सरकारला झुकावे लागेल अशी सामान्य नागरिकांमध्ये अशा निर्माण झाली आहे.
नाशिक – पुणे सरळ रेल्वे मार्ग हा उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. मात्र महायुतीच्या सत्ताधाऱ्यांमुळे हा मार्ग बदलला गेला असून संगमनेर अकोले सह सिन्नर,नारायणगाव,चाकण,खेड,मंचर या तालुक्यांवर मोठा अन्याय झाला आहे.हा रेल्वे मार्ग सरळ व्हावा याकरता काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, मंत्री छगन भुजबळ,खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, माजीमंत्री आमदार माणिकराव कोकाटे, आमदार शरद दादा सोनवणे, आमदार विलास लांडे, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात यांच्यासह कलाक्षेत्रातून पद्मश्री रघुवीर खेडकर, क्रीडा क्षेत्रातून महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, संगमनेर तालुका व्यापारी असोसिएशन, तालुक्यातील सर्व विद्यार्थी संघटना, सर्व पुरोगामी संघटना, साहित्यिक,कलावंत, शेतकरी नागरिक महिला यांच्यासह झेन जी युवक व युवतींचा मोठा सक्रिय पाठिंबा मिळत आहे.लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरातील सर्वपक्षीय नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून व्यापारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संगमनेर तालुका व विभागासाठी ही रेल्वे किती गरजेची असून यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल असा ठाम विश्वास मालपाणी लॉन्स येथील बैठकीत व्यक्त केला.तालुक्यातील व परिसरातील गावांमधील कार्यकर्ते हक्काच्या रेल्वेच्या लढाईसाठी प्रचार प्रसार करत असून सिन्नर तालुका नारायणगाव तालुका अकोले खेड राजगुरुनगर मंचर आळेफाटा या विविध ठिकाणीही नागरिकांमध्ये मोठी जनजागृती करण्यात आली आहे.रविवारी ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने आंदोलन उभे राहणार असून समृद्धी महामार्गसह नाशिक पुणे हा राष्ट्रीय महामार्ग अडवला जाणार आहे. या चक्काजाम आंदोलनाचे पडसाद केंद्र व राज्य सरकारवर पडणार असून कोणत्याही परिस्थितीत ही सरळ रेल्वे झालीच पाहिजे असा आग्रही सर्व तालुक्यातील नागरिक व रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला आहे
सोशल मीडिया वरूनही तरुणांचा मोठा पाठिंबा
सोशल मीडियावर महाविद्यालयीन युवक युवती विद्यार्थी याचबरोबर तरुणांनी चक्काजाम आंदोलनाला मोठा पाठिंबा दर्शवला आहे. या आंदोलनामध्ये सहभागाची हाक दिली जात असून सत्ताधारी महायुतीच्या लोकांनी केलेली पळापळी वरही युवकांनी टीकेची झोड उठवली आहे. ज्यांच्यामुळे रेल्वे गेली तेच आता भेटीगाठी घेत असल्याची टीका छात्र भारतीचे अनिकेत घुले यांनी केली आहे.



