ब्रेकिंग

रस्ते, सांस्कृतिक सभागृह, कब्रस्तान संरक्षण भिंत व सुशोभीकरणाच्या कामांना मिळणार वेग – आमदार आशुतोष काळे

१.३० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या निविदा प्रसिद्ध

रस्ते, सांस्कृतिक सभागृह, कब्रस्तान संरक्षण भिंत व सुशोभीकरणाच्या कामांना मिळणार वेग – आमदार आशुतोष काळे

जाहिरात मो-7756045359

१.३० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या निविदा प्रसिद्ध

कोपरगांव  । प्रतिनिधी । कोपरगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी तसेच ग्रामीण व नागरी भागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने महायुती शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी सुमारे १ कोटी ३० लाख रुपयांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.मतदार संघातील रस्ते, सार्वजनिक सुविधा, सामाजिक व धार्मिक स्थळांचा विकास आणि सांस्कृतिक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देत शासनाकडून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी आमदार काळे सातत्याने प्रयत्नशील आहेत. या निधीमुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना गती मिळणार असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अनेक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.प्रसिद्ध झालेल्या निविदांमध्ये माहेगाव देशमुख येथील ६ चारी रस्ता ते भिकनभाई सय्यद वस्ती (ग्रामीण मार्ग क्र.२१) रस्ता मजबुतीकरण करण्यासाठी ४० लाख रुपये, कोळगाव थडी येथील ग्रामीण मार्ग क्र.२९ ते इब्राहिम शेख वस्ती रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ३५ लाख रुपये, वेस येथील मुस्लीम मोहल्ल्यात सांस्कृतिक सभागृह बांधण्यासाठी २० लाख रुपये, चितळी येथील कब्रस्तान संरक्षक भिंत बांधण्यासाठी २० लाख रुपये, तसेच रवंदे येथील कब्रस्तान सुशोभीकरण व सी.डी.वर्क करण्यासाठी १५.५० लाख रुपये मंजूर झाले असून या सर्व कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत.या विकासकामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामांना प्रारंभ होणार आहे. रस्ते, सार्वजनिक सुविधा, सामाजिक व धार्मिक स्थळांचा विकास यामुळे नागरिकांच्या अडचणी कायमच्या दूर होणार असून संबंधित गावांतील नागरिकांना दर्जेदार रस्ते, सुरक्षित सार्वजनिक सुविधा आणि आवश्यक सामाजिक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे चितळी, वेस, माहेगाव देशमुख, कोळगाव थडी, रवंदे आदी गावांमध्ये समाधानाचे वातावरण असून नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

कोपरगाव मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे. कोपरगाव मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी व नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. विकासकामांसाठी निधी आणण्याची ही प्रक्रिया यापुढेही अधिक वेगाने निरंतर सुरु राहील.- आमदार आशुतोष काळे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!