ब्रेकिंग

अधिकारी निष्क्रीय होतात तेव्हा लोकांच्या भावनांचा उद्रेक होतो – मंत्री विखे पाटील

प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याच्या भूमीकेतून काम करण्याचे निर्देश

अधिकारी निष्क्रीय होतात तेव्हा लोकांच्या भावनांचा उद्रेक होतो – मंत्री विखे पाटील

जाहिरात मो-7756045359

प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याच्या भूमीकेतून काम करण्याचे निर्देश

पारनेर । प्रतिनिधी । अधिकारी निष्क्रीय होतात तेव्हा लोकांच्या भावनांचा उद्रेक होतो.प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याच्या भूमीकेतून काम करण्याचे निर्देश जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.पारनेर तालुक्यात मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करणयात आले होते.आ.काशिनाथ दाते भाजपाचे अध्यक्ष राहूल शिंदे सुजित झावरे विश्वनाथ कोरडे अशोक सावंत यांच्यासह सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि नागरीक उपस्थित होते.

तालुक्यातील पाणी वीज रस्ते औद्योगिक वसाहतीच्या संदर्भात बैठकीमध्ये नागरीकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची दखल घेवून मंत्री विखे पाटील यांनी संबंधित विभागांच्या अधिकार्यांना सूचना दिल्या.औद्योगिक वसाहती मधून तलावात सोडण्यात येणाऱ्या रसायनयुक्त पाण्याबाबत प्रांताधिकार्यांनी तातडीने चौकशी करून प्रदूषण नियंत्रण मंडळाला अहवाल पाठविण्यास सांगितले.जामगाव येथे टॅकरची मागणी असतान सुध्दा निर्णय होत नसल्याबद्दल गटविकास अधिकारी सोनकुसळे यांना मंत्री विखे पाटील यांंना चुकीची माहीती दिली म्हणून मंत्र्यांनी कडक शब्दात ताकीत देवून तातडीने टॅकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

शहरातील रस्त्यांचे काम दुभाजक टाकूनच पूर्ण करावेत असे स्पष्ट निर्देश देताना पावसाच्या कारणाने रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे तातडीने बुजवून नागरीकांची गैरसोय दूर करण्यास त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.तालुक्यातील सहा उपसा सिंचन योजनांना जलसंपदा विभागाने मंजूरी दिली आहे.यापैकी तीन योजनांना मुळा धरणातून पाणी उपलब्ध होत आहे.अन्य तीन योजनासाठी पाण्याची उपलब्धता करून देण्याबाबत लवकरच निर्णय होईल.त्यामुळे अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.पिंपळगाव जोगा धरणातून पाणी सोडण्याच्या सूचना विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असून,चार्याच्या दुरुस्तीसाठी १०१कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.यापुर्वी तालुक्यात फक्त खंडणीराज होते.योजना फक्त कागदावर होत्या.फक्त बील काढण्याचे काम झाले.पण आता तालुक्याची परिस्थिती पूर्णपणे बदलत आहे.गुंडगिरी हद्दपार होवून विकासाची काम होत आहेत.आ.दातेच्या माध्यमातून अजून खूप काम होणार असल्याने निधी कमी पडणार नाही.नागरीकांनी ठेवलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.आ.काशिनाथ दाते यांनी आपल्या भाषणात अधिकाऱ्यांनी काम करण्याबाबत गांभीर्य दाखवावे.कामासाठी लोकांना चकरा मारायला लावू नका.वीज भारनियमनाच्या संदर्भात प्रश्न मांडून समस्या सोडविण्याची विनंती पालकमंत्र्यांना केली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!