ब्रेकिंग

कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग सोसायटीची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग सोसायटीची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग सोसायटीची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

कोपरगांव । प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या हितासाठी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी अनेक सहकारी संस्था स्थापण केल्या आणि त्या संस्था जीवापाड जपल्या त्यापैकीच कोपरगाव तालुका सहकारी जिनिंग प्रेसिंग सोसायटी हि एक संस्था आहे. काळानुरूप आलेल्या सर्व प्रकारच्या संकटावर मात करून संस्थेने कोरुगेटेड बॉक्स तयार करण्याचा पर्यायी व्यवसाय सुरु केला आणि त्यात यश मिळवून हा व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरु आहे .अहवाल सालात संचालक मंडळाने अतिशय चांगले काम करून नफा देखील चांगला मिळविला असून ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला ही समाधानाची बाब आहे असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुका सहकारी जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या ६५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित सभासद आणि संचालक मंडळाशी संवाद साधतांना केले.


कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनिंग अॅण्ड प्रेसिंग सोसायटीची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात संस्थेचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी उपस्थित सभासदांना आ.आशुतोष काळे यांनी मार्गदर्शन करून संवाद साधला. संस्थेचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार यांनी प्रास्ताविक केले. अहवाल वाचन संस्थेचे जनरल मॅनेजर सुरेश काशीद यांनी केले.श्रद्धांजली ठराव वाचन संचालक महेश लोंढे यांनी केले. सभासदांच्या वतीने विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे मा.व्हा.चेअरमन पद्माकांत कुदळे, विद्यमान संचालक दिलीपराव बोरनारे,सुधाकर रोहोम, शंकरराव चव्हाण, विष्णू शिंदे, माजी संचालक राजेंद्र गिरमे, शिवाजीराव ठाकरे तसेच संस्थेचे व्हा.चेअरमन संजय संवत्सरकर, संचालक नानासाहेब निकम, शंकरराव गुरसळ, सुभाष सोनवणे, सचिन आव्हाड, गणेश गायकवाड,महेश लोंढे, नानासाहेब चौधरी, संदीप शिंदे, पाराजी गवळी, सौ. विमलबाई गवारे, सौ. कांताबाई दहे, शिवाजीराव शेळके, संतोष वर्पे आदी मान्यवरांसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन गुलाब शेख यांनी केले तर व्हा.चेअरमन संजय संवत्सरकर यांनी आभार मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!