ब्रेकिंग

भाजपच्या पाच नगरसेवकांचा सौ.प्रभावती घोगरे यांना जाहीर पाठिंबा

राहता नगरपालिकेतील नगरसेवकांचा महाविकास आघाडीला पाठिंबा

भाजपच्या पाच नगरसेवकांचा सौ.प्रभावती घोगरे यांना जाहीर पाठिंबा

राहता नगरपालिकेतील नगरसेवकांचा महाविकास आघाडीला पाठिंबा

शिर्डी ( प्रतिनिधी ) जातीयवादी तेढ निर्माण केल्याने महाराष्ट्रात मोठी अस्वस्थता वाढली असून राहता मतदार संघातील दडपशाही व दादागिरीला कंटाळून राहत्यातील भाजपच्या पाच नगरसेवकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ प्रभावती ताई घोगरे यांना विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा दिला आहे.

ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये राहता नगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपच्या सौ अनिता अभिजीत काळे, सौ.निलम दीपक सोळंकी, माऊली आप्पा गाडेकर, सचिन गाडेकर हे चार नगरसेवक व रासपचे बाळासाहेब गिधाड अशा पाच नगरसेवकांनी सौ घोगरे यांना विधानसभेसाठी जाहीर पाठिंबा दिला. राज्यामध्ये परिवर्तन अटळ असून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार आहे. त्याचप्रमाणे शिर्डीमध्ये ही परिवर्तन होणार असून तालुक्याच्या विकासाकरता सातत्याने लढणाऱ्या सौ.प्रभावती घोगरे यांचे स्वच्छ व्यक्तिमत्व आणि सर्वसामान्यांसाठी काम करण्याची तळमळ याकरता आम्ही सर्व एक मुखाने सौ.घोगरे यांना पाठिंबा देत असल्याचे बाळासाहेब गिधाड यांनी म्हटले आहे.

तर सौ.निलम सोळंकी म्हणाल्या की, लाडकी बहीण म्हणून जाहिरात बाजी करणाऱ्या सरकारने गोरगरिबांच्या खिशातील पैसे काढून महिला भगिनींना वाटले. महिलांना पैशापेक्षा सुरक्षितता महत्त्वाची असून महाविकास आघाडी ही विकासाची आघाडी असल्याने तालुक्यातील सर्व महिला भगिनी या सौ.प्रभावती घोगरे यांच्या पाठीशी भक्कम उभे राहिल्या आहेत. आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नसून महिला म्हणून महिलेच्या पाठीशी आम्ही उभे असल्याचे अनिता काळे यांनी सांगितले तर राहता मतदार संघातील दडपशाहीला जनता कंटाळली असून स्वातंत्र्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देत असल्याचे मुरली आप्पा गाडेकर म्हणाले. तर तरुणाई मध्ये बदलाचे वारे निर्माण झाली असून याकरता आपला सौ घोगरे यांना पाठिंबा असल्याचे सचिन गाडेकर यांनी म्हटले.

यावेळी सौ.घोगरे म्हणाल्या की, गावोगावी जनतेचा सातत्याने मोठा पाठिंबा मिळत आहे. परंतु या तालुक्यांमध्ये इतकी दहशत आहे. की समोर कोणी यायला घाबरत आहे.सर्वजण सांगत आहे ताई तुम्ही बिनधास्त रहा. मतदान गुप्त आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्यामुळे राहता तालुक्यात परिवर्तन निश्चित होणार असून कोणीही दडपशाहीला न घाबरता लोकशाहीत आपला हक्क बजावून मला भक्कम पाठिंबा द्या असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रचंड टाळ्यांच्या कडकटामध्ये या पाचही भाजप नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. हा विखे गटासाठी मोठा धक्का मानला जात असून विखे यांच्या विरोधात मतदारसंघात सुप्त लाट असल्याची सर्वाधिक चर्चा आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!